स्वप्नपूर्ती रक्त सेवा तर्फे विकास बोरकर यांचेकडून 33 वा रक्तदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 22जून):- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखल्या जाते. खरतर आज रक्त कमतरतेच संकट राज्यभर आहे. थैलेसेमिया रुग्ण, रक्त कॅन्सर रुग्ण, अपघातग्रस्त, गरोदर स्रियांना, तसेच इतर रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आपण सर्व अहोरात्र धावपळ करतो हे निश्चित आनंदाची बाब आहे.हि चळवळ अजून मजबूत करूयात असे विकास बोरकर घेऊन चालत आहेत. आज विविध ठिकाणी रक्तदान शिबीर असेल तेथे किंवा रक्तपेढीत जाऊन रक्तदान करा तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील रक्तदान करायला आवाहन करा असे रक्तदाते विकास बोरकर यांनी तरुण युवाना आव्हान केले आहे.

रक्तदान, जीवनदान काळ-वेळ, ऊन-पाऊस, जवळ-दूर असा कुठलाही विचार न करता क्षणार्धात धावुन येणा-या सर्व रक्तदात्यांना लाल क्रांतिकारी सलाम करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा थैलेसेमिया व स्वप्नपूर्ती रक्त सेवा समितीचे सदस्य 33 व्या वेळी रक्तदान करताना विकास भाऊ बोरकर b+ लगेच त्यांनी ख्रीस्तानंद ब्लड बैंक ब्रम्हपुरी येथे येऊन हर्षल नागरे या पेशंट करीता O + ब्लड ग्रुप डोनेशन केले त्या बद्दल युवा रक्तदात्याला लाल क्रांतिकारी सलाम करण्यात आले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED