योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा योग दिन उत्साहात

🔹पोलीस अधिकारी, 500 महिला पोलीस व कर्मचारी यांचा उस्फुर्त सहभाग

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.22जून):-पोलीस प्रशिक्षण केंद्र मध्ये मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त तुरची, तासगाव (सांगली) येतील पोलीस पटांगणात प्राचार्य ज्योती क्षीरसागर यांच्या विनंतीला मान देऊन आंतरराष्ट्रीय योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. डॉ. गिरी यांनी योगाचे महत्व पटवून देऊन प्रात्यक्षिके करून घेतली.

पद्मासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार, वीरासन, नौकासन, मार्जारासन अशी विविध आसन करत त्याची प्रात्यक्षिके पहात तुरची पोलीस केंद्रातील 500 महिला पोलीस व पोलिस अधिकाऱ्यांची सुरुवात झाली. योगाचे अनेक देश विदेशमध्ये योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांची प्रात्यक्षिकपर कार्यक्रम झाली आहेत.पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव, सांगली तर्फे सकाळी सव्वा सात वाजता पोलीस पटांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी, लोकमत सखी मंच प्रतिनिधी डॉ. सुरेश राठोड(मुक्त पत्रकार), मार्शल योग शिक्षक उर्मिला भारती, नितीन गिरी, योग सहाय्यक सोनल नाईक (मॉडेल), व पोलीस अधिकारी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी वाहून योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.योगसद्गुरु डॉ गिरी यांनी स्वतः योग प्रात्यक्षिके सादर केली. आतापर्यंत त्यांनी एक लाखापेक्षा अधिक लोकांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी पोलीस खात्यामध्ये पंचवीस वर्ष सेवा बजावत स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशच्या सदस्यपदी कार्यरत आहेत. यांनी प्राचार्य ज्योती क्षीरसागर यांच्या विनंतीला मान देऊन प्रात्यक्षिक रुपाने योगाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे अवघे सर्व वातावरण ‘योग’ माय बनले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED