आम्ही शिवसेने सोबतच-उमरखेडच्या शीवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

🔸मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा केला निषेध

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.23 जून) राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेना नेते यांनी केलेल्या पक्षांतर्गत बंडाच्या निषेधार्थ स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत असून शिवसेनेतून बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरुद्ध शहरातील व तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली त्याच बरोबर शिवसैनिक ठाकरे साहेब यांच्या सोबत कायम आहेत अशी भूमिका जाहीर केली बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असून विरोधकांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह केलेल्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी शिवसेनेचे चितांगराव कदम, ऍड. बळीराम मुटकुळे, राजीव खांमनेकर, प्रशांत पत्तेवार, अरविंद भोयर, सतीश नाईक, कैलास कदम, संदीप ठाकरे, अमोल तीवरंगकर,गजेंद्र ठाकरे, रेखाताई गव्हळे, रेखाताई भरणे, राहुल सोनवणे, वसंता देशमुख, निलेश जैन, संजय पळसकर ,कपील चव्हाण आदीसह शिवसेनेचे तालुका व शहर, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, युवा सैनिक सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED