वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्गाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन शेतकरीपुत्रांना नौकरीत सामाऊन घ्या

56

🔸मनसेचे केन्द्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.23जून):-वर्धा – यवतमाळ – नांदेड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी उमरखेड तालुक्यातील सुमारे 400 ते 500 शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी संपादित करण्यात आल्या मात्र केन्द्र सरकारकडून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प प्रमाणात आर्थिक मोबदला देऊन बोळवण करण्यात आली त्यामुळे प्रकल्पात जमिनी गमावल्यामुळे शेतकरी कुटूंबांचे भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी केन्द्र सरकारने सारासार विचार करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस प्रमाणात वाढीव मोबदला देऊन त्यांच्या पाल्यांना नोकरीत सामाऊन घ्यावे अशी मागणी केन्द्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

उमरखेड तालुक्यातून जाणाऱ्या वर्धा – यवतमाळ – नांदेड प्रस्तावित रेल्वेमार्ग व नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे भुसंपादन व जमिनीचा मोबदला सन 2017 – 18 मध्ये अत्यल्प प्रमाणात मिळाला सदर प्रकल्प केन्द्र शासनाचे असून यामध्ये राष्ट्रीय महामार्गात संपादित झालेल्या जमिनीचा प्रतिगुंठा 2 ते 2.50 लाख रुपये मोबदला देण्यात आला तर दुसरीकडे रेल्वे प्रकल्पग्रस्तांना कोरडवाहू जमिनीला प्रती गुंठा 27 हजार व बागायतीला 40 हजार रुपये असा दुजाभाव झाल्याचा आरोप मनसेने दिलेल्या निवेदनात केला आहे.

या अत्यल्प मोबदल्यामुळे रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून उमरखेड तालुक्यातील रेल्वे प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनी सिंचन क्षेत्रात येतात.

पैनगंगा नदी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी उपलब्ध होते.

सर्व शेतकरी हंगामी बारमाही ऊस , हळद , केळी, कापूस, सोयाबिन व फळबागा इत्यादी पिकांचे उत्पादन घेतल्या जाते.

यावरच शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो . त्यातच अत्यल्प मोबदला मिळाल्यामुळे आपल्या कुटुंबांचे भविष्य अधांतरी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाढीव मोबदल्या बाबत शेतकऱ्यांनी शासनाला वारंवार निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी नेस्तनाबूत होत असल्याने त्यांना वाढीव मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी सामावून घ्यावे अन्यथा मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे उपजिल्हा प्रमुख डेवीड शहाणे , शहर अध्यक्ष संजय बिजोरे, संदिप कोकाटे, मनोज कदम, कपील कांबळे , महेश काळबांडे , अमोल लांबटिळे, आकाश ओझलवार , सुनिल भांडवले, नितीन दळवी , सचिन शेरे, अमोल मोरे , प्रविण कनवाळे आदिंनी दिला आहे.