वंचित बहुजन आघाडी जालना शहराची बैठक संपन्न

29

✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जालना(दि.28जून):- वंचित बहुजन आघाडी येणार्‍या जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम यांच्या अध्यक्षतेखाली व अँड बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली लढविणार आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जालना शहराची बैठक शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला जिल्हाध्यक्ष रमा होर्शिळ, जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव, महिला शहराध्यक्ष जया आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 28/06/2022 रोजी साय. 05:00 वा जालना जिल्हा संपर्क कार्यालय येथे घेण्यात आली.

यामध्ये जालना युवक शहर कार्यकारणी संदर्भात चर्चा करण्यात आली त्यानंतर येणाऱ्या जालना नगरपरीषद निवडणुक संदर्भात अनेक विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रमाताई होर्शील,जालना शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे,जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव, महिला शहराध्यक्ष जया आठवले, किशोर जाधव, अमोल लोखंडे, भाग्यश्री निर्मल, सोनी कसबे, विकास हिवाळे, प्रदीप गायकवाड सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.