घुग्घुस येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक मुंली, मुलांचे शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

दिनांक 29 /6/2022 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुग्घुस कन्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुग्घुस मुले इथे प्रवेशोत्सव ,शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2,पुस्तक दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात अध्यक्ष मान.कातकर सर केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी बीट घुग्घुस.उद्घाटक मान.श्री तुळशीदास भगत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कन्या शाळा तसेच मान. आत्राम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मान.मोरे मॅडम,दिवसे मॅडम ,दागमवार सर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . सर्वप्रथम प्रास्ताविक मान. मोरे मॅडम यांनी केले. मान. दागमवार सर यांनी पालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच माननीय अध्यक्ष मार्गदर्शन कडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळा पूर्वतयारी कार्यक्रम मेळावा चे उद्घाटन करून इयत्ता पहिली दाखल पात्र सर्व विद्यार्थ्यांचे विकास कार्ड वरील सर्व कृती करून घेण्यात आल्या. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप ,स्कूल बॅग ,शालेय गणवेश वाटप करण्यात आले .

तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला पालक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन माननीय प्रतिभा येरमे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन माननीय रोशन काळे सर यांनी केले.यावेळी मुख्याध्यापिका कु. मंदा. बी. मोरे मॅडम थोडे मॅडम, तरवटकर मॅडम, दासरवार मॅडम, येरमे मॅडम, मसराम मॅडम,महेंद्र पाल सर,रोशन सर,पाझारे सर,दिवसे मॅडम व पालक विद्यार्थी उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED