राजकीय चळवळ गतिमान करा!

29

मी बसपा समर्थक आहे. बहन मायावती आणि कांशिरामजी यांचं राजकारण मला आवडतं. तरी या वेळी मी प्रकाश आंबेडकरांच्या बाजुने राहीलाे.त़्यासाठी लेखनही केलं. मतही दीलं. म्हणून नाहक कांशिरामजी आणि बहनजींना शिव्याशाप करणं मी मान्य करत नाही. कारण माझी तशी लायकी नाही. त्यांचं काम अफाट आहे. राजकारणात पाय ठेवण्याआधी त्यांनी डीएसफाेर संघटने तुन समाज बांधनी केली.ताे काळ १९८४ चा असावा.मी तेव्हा १४/१५ वर्षाचा असेन.प्रत्येक कर्मचाऱ्याकडे आठवड्यातुन सभा असायची.माझ्या गावातील,शेजारच्या गावातील आणि त्या कर्मचाऱ्याच्या घराजवळील लहान मुलं त्या सभेत असायची. सर्वांना बाबासाहेब समाजाऊन सांगणारा एखाद कर्मचारी वक्ता असायचा.चार भिंतीत ती सभा असायची त्यामुळे बाेबल्या नसायचा.आणि विजही प्रत्येकांकडे नव्हती.नंतर आम्हाला म्हणजे लहान मुलांना,तुम्ही काय बनणार? असा प्रश्न असायचा.माझ्यासह अनेकांना ते ऊत्तर देता येत नव्हतं. अगदी तेव्हापासुन मी कांशिरामजींचं सामाजिक काम पाहीलं. मांगनेवाली नही देनेवाली जमात बनाे म्हणजे शासनकर्ती जमात व्हा.हे सांगीतलं म्हणजे बाबासाहेब सांगीतला. आता मराठ्यांच्या आरक्षणाचा आणि धनगराच्या आरक्षणाचा विषय वादग्रस्त आहे.पण जे सरकार चालवतात त्यांनी हवा न येऊ देता दहा टक्याचं आरक्षण मान्य करुन घेतलं.बाबासाहेब सांगतच कांशिरामजींनी जीतनी जीनकी संख्या भारी ऊतनी ऊनकी भागीदारी असं सांगितलं.

गावांचे नाव आंबेडकर ग्राम, बुद्ध ग्राम ठेउन काय फायदा झाला. असा प्रश्न काही निर्बुद्ध करतात.मग पंधरा वर्ष नामांतराचा लढा का लढावा लागला? पाच माणसांचा त्यासाठी बळी का द्यावा लागला? कित्येक वस्त्या त्यावेळी जळून राख का झाल्यात? कशासाठी? कारण ताे आपल्या अस्तीत्वाचा आणि सांस्क्रुतीक वारस्याचा प्रश्न आहे.कांशिरामजींना वेगळा राजकिय पक्ष काढल्याचा आराेप लावला जाताे. पण बाबासाहेबांच्या कल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झालेत.तरी हे मान्य हे सारे बाबासाहेबांचे वारस आणि कांशिरामजी बेवारस. खरे तर महाराष्ट्र बाबासाहेबांची कर्मभुमी आहे.पण महाराष्ट्रातील राजकारण भाजप सेनेकडे आणि काँग्रेसकडे गहान टाकणारे रिब्लिकन नेते आणि त्यांचे चमचे बाबासाहेबांचे अनुयाई ! राजकीय क्रांतीचे प्रणेते! आणि कांशिरामजी हिंदू ह्रदय सम्राट! पायातील जाेडा बदलावा तसे पक्ष बदलणारे काँग्रेच्या पंजावर तिकिट लढवणारे लाचार आंबेडकरवादी. आणि कांशिराम, मायाजी अवसरवादी. छान. बसपास मते मागणारे, समर्थक सगळे भक्त. आणि रिपब्लिकन पक्षाची काँग्रेच भाजपशी युती करुन काँग्रेस भाजपच्या यशासाठी झटणारे निले निशानवाले आंबेडकरवादी. खुपच मस्त. हे सगळे कार्यकर्ते. सगळ्या गटांचे मालक अखिल भारतीय अध्यक्ष. आणि सगळे महाराष्ट्रात लढणार तेही युतीचा धर्म पाळण्यासाठी काँग्रेस भाजपच्या यशासाठी लढणार. आणि मागच्या दारातुन आपण प्रवेशणार म्हणजे विधान परिषद,राज्यसभा. कारण बाहेर जाऊन लढायला दम नाही.

ही गांडुगीरी यांची. पण देशभर लढणाऱ्या बसपाला नावे ठेवणार हे आंबेडकरवादी. प्रकाश आंबेडकरांनाही भाजपची बी टीम म्हटलं तेव्हा वंचितच्या समर्थनार्थ मी लेख लिहुन आंबेडकरांची पाठराखण केली.मी भक्त असताे तर बसपा चा नारा घेऊन फीरलाे असताे.पण समाजाचा कल बघुन वंचितचा प्रचार केला. प्रत्येक शब्दात भक्त लावुन आपला आंबेडकरवाद थाेपवणारी आणि आपल्या अभ्यासाचे तारे ताेडणारी माझी जात नाही.मला आंबेडकरवादी म्हणून कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.बाबासाहेबांचा पक्ष ईथल्या संधीसाधुंनी ईथेच निर्माण केला आणि ईथेच ताे माेडीत काढला. ही राजकीय क्रांती आहे असं कुणाचं मत असेल तर खुशाल असु द्यात. मी राजकीय क्रांती झाली नाही असं मानताे.५४७ खासदरात मध्ये रिपब्लिकनचा एकही नसेल त्याला मी राजकीय क्रांती मानत नाही. आणि मी मानत नाही म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा मारेकरी आहे असं कुणी मत बनवत असेल तर हाेय मी मारेकरी आहे.पण ज्यांनी भाजप काँग्रेसच्या विजयाचं गणित मांडलं आणि रिपब्लिकन पक्षच नाममात्र ठेवला ते काेण आहेत?

महाराष्ट्रात बाैद्ध आहेत.महार आहेत. ईथल्या भुमीवर जागतिक क्रांती झाली.ती क्रांती म्हणजे धम्मदीक्षा.आज कांशिरामजी आणि बहनजींवर चिखलफेक करून त्यांच्या दीक्षेवर प्रश्न करणाऱ्यांनी महाराष्ट्रात बाबासाहेबांनंतर काेणती धार्मिक क्रांती केली? कांशिरामजी स्वतः धम्म जगले. युपीत सत्ता भाेगली.महाराष्ट्रात महार बाैद्ध आहेत तरी ते शक्य झालं नाही.युपीत चांभार हा माेठा समाज आहे.त्यांच्या मनात बाबासाहेब,बुद्ध,शाहू,फुले ठेवण्यात कांशिरामजी,बहनजी यशस्वी ठरल्यात.हे कांशिरामजींना शिव्याशाप करणाऱ्या लाेकांनी कितीही आगपाखड करु द्यात.त्यांच्याकडे सांप्रत स्थितीत राजकीय प्रगती सांगण्यासाठी काही नाही हेच अंतीम वारस्तव आहे. आता आपसातील मतभेद विसरून प्रत्येक गट संघटनांनी एकमेकांशी मैत्री केली पाहिजे. त्याशिवाय राजकीय चळवळ गतिमान होणार नाही.

✒️राजू बाेरकर(लाखांदुर जि.भंडारा)मो:-७५०७०२५४६७