जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात निर्णायक विजय! तथा गेवराई पंचायत समिती सभापती रयत शेतकरी संघटनेचाच होणार – सुनील ठोसर

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2जुलै):-प्रतिनिधी गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ता तथा रयत शेतकरी संघटनेचा प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर आपण आजपर्यंत विविध घटकांच्या विकासासाठी विविध भागात अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम केलं आहे यासह माझा मित्र परिवार व आपण सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणूक सर्व गटात लढविणार असल्याचे मी स्पष्ट करत आहे सध्यातरी रयत शेतकरी संघटनेचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या काळात जनतेच्या कामात व्यस्त असून अनेक जिल्हा परिषदेच्या गटातून राजकीय पक्षांनी तिकीट नाकारल्यास आम्हाला रयत शेतकरी संघटना माध्यमातून तिकीट द्यावे असे अनेक मात्तबर उमेदवार माझ्या संपर्कात आहेत निवडणुका तोंडावर आल्या होत्या म्हणून कोणताही राजकीय,भावनिक आदी फालतू धंदे आपण केलेले नाही.

आपण आपल्या सहकार्याच्या माध्यमातून कोविड काळात गोरगरीब जनतेला अन्न धान्य वाटप केले, रुग्णांना वैयक्तिक गरजांनुसार औषधोपचार केले, कोविढ सेंटर मराठवाड्यात नाही अशी प्रशासनावर कायम करडी नजर ठेवत प्रत्येक रुग्णांपर्यंत सेवा पुरवली सत्ता ना नेता ना कुठली टाकत तरीही सामान्य माणसाच्या रोजच्या अडचणीत कायम तत्पर आपल्या साक्षीने विविध माध्यमातून आपण पाहिलेले आहेच यात शंका असूच शकत नाही! प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा हा एकमेव परिवार आहे.शेतकऱ्यांसाठी नेहमी विविध प्रश्नावर महावितरण,पोलिस प्रशासन,बँक,तहसील,पंच्यायात समिती,कृषी कार्यालय,भूमी अभिलेख,पीकविमा,पी,एम,किसान,निराधार,बियाणे,खते,औषध आदी सर्व प्रश्नाचे पाठपुराव्याने आपण साक्षीदार आहात सत्तेसाठी ना स्वार्थासाठी …..आपण कायम लढणार आपल्या माणसासाठी….ही ओळख निर्माण झाली आहे. गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व घटकांशी कायम संपर्क असतो.

तेथील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या संधर्भात शासनाला निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून वेळप्रसंगी खडे होऊन मोर्चे,आंदोलने,उपोषण करत कायम तालुक्यातील हजारो विषय मार्गी लावलेले आहे याचं सामाजिक व राजकीय कार्यातून अनेक कामे लोकांचे केल्या जातात.त्यासाठी आता येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. आज अनेक समस्या सोडविण्यासाठी कोणताही नेता दिसत नाही फोनवर गप्पा मारणारे अनेक पाहीले आहे मी पण अनुभवले आहे आज आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात,गटात उमेदवार देत आहे तालुक्यातील जनतेने आपल्या परिवारातील सदस्य समजून सभागृहात पाठवणे गरजेचे आहे गाव,वडी,वस्ती,तांडा आदी ठिकाणी अनेक ठिकाणी कार्यकर्ते जनतेचे रक्षक नसून भक्षक दिसत आहेत जो तो आपला स्वतःचा विकास करताना दिसत आहे आजच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी केलेले.

शिव,पांदन,गाडी रस्ते यावर कोटी रुपयांचा निव्वळ घोटाळा सर्रास सुरू आहे हे आपणास माहीत आहे तालुक्यात कुणाला माहीत नसेल तर सुनील ठोसर सर्व बोगस रस्ते ग्रामसभा घेऊन जाहीर दाखवण्यास सुरुवात करेल याची नोंद घ्यावी वृक्ष लागवड मध्ये कोटी रुपयांचा घोटाळा केला, घरकुल योजनेचा घोटाळा, रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना लवलून हजारो बोगस रोजगार दाखून घोटाळा, नळ योजना कशी घोटाळा करावा याला हद्दच राहिली नाही, रमाई घरकुल प्रकरणात घोटाळा, वसंत राव नाईक वस्ती सुधार योजना घोटाळा, झोपपट्टीवासीयांना कामे न करता बिले उचल जात,गाव पातळीवरील कोणत्याही प्रशासकीय अधिकारी यांचेवर कामकाजाचा अहवाल नाही कोणताही विषय आला की बगलबच्चे ,नेता,बंगला घोटाळे अधिकारी करतात आणि आधार बंगल्याचा याचाच हिशोब पाहण्यासाठी आपण येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार उभे करून सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत….एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहेत.लोकांचा विकास करून स्पर्धा करत नाही. सगळी कडे भ्रष्टाचार होतोय.लोकांचे कामे तत्काळ होत नाहीत. गेवराई तालुक्यातील विकास साधायचं असेल तर परिवर्तन करणे गरजेचे आहे. गेवराई तालुक्यातील प्रत्येक मतदारांनी योग्य रित्या मतदानाचा हक्क बजावला तर विकास झाल्या शिवाय राहणार नाही. गेवराई तालुक्यातील लोकांना माझ्या माध्यमातून योग्य पर्याय म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED