आदर्श शिक्षक विजयजी कोठेकर सर…!

26

शिक्षक हा कुठलेही राष्ट्रनिर्माण करण्यासाठी सर्वात पूरक असा व्यक्ती असतो. प्राचीन काळापासून आपण गुरु किंवा शिक्षकाचे महात्म्य ऐकून आहो. विद्यार्धी किती हि मोठा झाला तरी गुरुची बरोबरी कधीच करू शकत नाही. तसे आपल्याला सर्व शिक्षक आदरणीय असतात पण काहीच आपले आदर्श बनू शकतात त्याच्याबद्दलच्या आपल्या आठवणी आणि त्यांनी रुजू घातलेल्या संस्कारांची ठेवण आजन्म आपल्या सोबत असते व आपल्या दैन्यंदिन जीवनात ती परीक्षेपित होते असते.माझ्या मनातील आदर्श शिक्षक माझे शिक्षक आ. प्रा. विजय कोठेकर सर आहे.

एक फुल बागेचा माळी म्हणून शिक्षक केवळ वनस्पतीच्या स्वरूपात असलेल्या विद्यार्थ्यांचे संगोपन करत नाही, तर त्यांना संस्कृतीच्या स्वरूपात फुले देऊन त्यांना चांगल्या माणसात वाढवून गुणांचा सुगंध सुद्धा देत असतो. आपले सामाजिक आणि मानसिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतात.

शिक्षक किंवा गुरू हे कुंभारासारखे असतात जे कुंभारकाम करताना ते एका हाताने हाताळतात आणि दुसऱ्या हाताने आकार देतात. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्याला शिस्तीने आकार देतात, जेणेकरून आपण चांगल्या भविष्याकडे वाटचाल करू. शिक्षकांशिवाय चांगल्या समाजाची कल्पना केली जाऊ शकत नाही.

शिक्षकाचा व्यवसाय हा या जगातील सर्वोत्तम आणि आदर्श व्यवसाय मानला जातो कारण शिक्षकांनी निस्वार्थपणे एखाद्याचे आयुष्य घडवण्यासाठी आपली सेवा दिली. त्याच्या समर्पित कार्याची तुलना इतर कोणत्याही कामाशी होऊ शकत नाही. शिक्षक ते आहेत जे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात. ते त्यांच्या खाण्याच्या सवयी, स्वच्छतेचे स्तर, इतरांकडे वर्तन आणि अभ्यासाकडे एकाग्रता तपासतात.

आदर्श शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचा चांगला विकास शक्य नाही. शिक्षक आपल्याला समाजात राहण्यास लायक बनवतात आणि आपल्यामध्ये विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता विकसित करतात. आपल्या प्रिय शिक्षकाबरोबरच आपण प्रत्येक शिक्षकाचा आदर केला पाहिजे.

शिक्षक कधीच वाईट नसतात, ही फक्त त्यांची शिकवण्याची पद्धत आहे जी एकमेकांपेक्षा वेगळी असते आणि विद्यार्थ्यांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण करते. शिक्षकांना फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंदी आणि यशस्वी पाहायचे आहे. एक चांगला शिक्षक आपला संयम कधीच गमावत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यानुसार शिक्षक शिकवत असतात. हे सगळे गुण मि विजय कोठेकर सरांमध्ये पाहतो आणि म्हणूनच मि त्यांना माझा आदर्श मानतो……

विशेष म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत मला खुपच आवडते, ते मला Biology विषय शिकवायला आहे. खुप छान सर शिकवतात.

सरांबद्दल बोलाव तेवढ कमीच आहे. फक्त एकच वाक्य सरांसाठी ( दुसरे विजय कोठेकर सर होणे शक्य नाही)

मनःपुर्वक धन्यवाद……..

सरांविषयी,

कमी वयात यशाचं,

शिखर तुम्ही गाठलं.

म्हणुनच गुरुजी दोन शब्द,

तुमच्यावर लिहावसं वाटलं…….

स्वतः च्या पायावर उभा राहण्याची,

मनात इच्छा दळवली.

कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही,

विद्यार्थ्यांच्या मनात चांगलीच जागा मिळवली……..

सुंदर विचारांनी,

मन आमचं घेरलं.

विजयजी कोठेकर नावाचं बीज,

आम्ही मनामध्ये पेरलं…….

मनाला तुम्ही,

शिक्षणरुपी आमृत पाजवलं.

आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात,

तुम्ही अभिराज्य गाजवलं…….

✒️लेखक:-सौरभ सुरेश काळे(9322068407)