नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचा इतर सर्व खर्च टाळून त्यांच्या आई इंदिराई यांच्या स्मरणार्थ सोलापूर प्रहार च्या वतीने फुटपाथ वरील बेघर लोकांना दिला निवारा

43

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.5जुलै):- लोकनायक नामदार बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस पाच जुलै रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो,परंतु सेवा हाच धर्म मानणाऱ्या बच्चुभाऊ यांनी प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बाकीचा इतर खर्च टाळून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पाच 5 जुलै ते 11 जुलै या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यातच एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून सोलापूर शहरातील अनेक,अपंग,महिला, वृद्ध फूटपात वर पावसात अत्यंत त्रासदायक परिस्थितीत राहत असल्याची बातमी एका मराठी वर्तमानपत्रात गेल्या चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली.यानंतर सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार यांच्या पुढाकाराने व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी संपर्कप्रमुख जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात अशा अनेक लोकांना निवारा देण्याचे प्रहारच्या माध्यमातून ठरविण्यात आले.

त्या अनुषंगाने ज्यांना अतिशय गरज आहे अशा लोकांना आज दिनांक 5 जुलैला सकाळी अकरा वाजता या निवाऱ्याचे वाटप करण्यात येणार आले, या अतिशय स्तुत ताशा उपक्रमानंतर फुटपाथ वरील बेघर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू ही आले..यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर संपर्कप्रमुख जमीर भाई शेख शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी,औद्योगिक कामगार जिल्हाध्यक्ष केशव जांभळे युनूस पठाण,दक्षिणचे तालुकाध्यक्ष मोहसिन तांबोळी,उत्तर सोलापूर अध्यक्ष फिरोज पठाण,माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे माजित पटेल,मुदतसर हुंडेकरी,उस्मान नदाफ सोमनाथ जाधव ताज बागवान तायाप्पा कोळी रमेश कुंभार अशपाक मुल्ला,अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते