वटस्थापना करून पोलिस उपनिरीक्षकानी पर्यावरणीय वाढदिवस केला साजरा

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.10जुलै):-निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊन जगणे हे नियतीमध्ये नाही. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान ठेऊन निसर्गाला चांगले जपले पाहिजे. आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही अश्यातच आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो.

निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण करू. अशोक, पिंपळ, वड यांसारखी झाडे सर्वत्र लावण्याची प्रामुख्याने गरज आहे.

नुकतीच पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या भावना राऊत (हजारे) यांनी पर्यावरण रक्षणाची जान ठेवून लाकूड डेपो बल्लार्षा येथे वनपाल बारस्कर साहेब, सोनाली वानखेडे (ठेंगरी) मॅडम, भूमिका मडावी मॅडम, बोंडे साहेब, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा ब्रम्हपुरी सचिव सुधीर ठेंगरी यांच्या उपस्थितीत झाडे लावा झाडे जगवा चा मूलमंत्र घेऊन वृक्ष लागवड केली.