अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक पदी विनायक महाजन यांची नियुक्ती

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.11जुलै):-अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,या सामाजिक संघटनेच्या वतीने धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच माळी समाज पंच मंडळाचे सल्लागार समिती सदस्य श्री विनायक शिवदास महाजन यांची जिल्हा सल्लागार पदी निवड करण्यात आली होती गेल्या काही वर्षात संघटनेचे काम अविरत पणे पार पाडत होते त्या कामाची पोच पावती म्हणून त्यांची पदोन्नती करून त्यांची विभागीय संघटक पदी निवड करण्यात आली त्यांच्याकडून देशसेवा समाजसेवा अध्यात्मिक सेवा घडावी यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या….

जळगाव येथील माळी भवन खोटेनगर,येथे संघटनेच्या जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्या प्रसंगी अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भाऊ गुलदगड व प्रदेश अध्यक्ष श्री जितेन्द्र भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार विभागीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED