बदली पोर्टल माहिती भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाची अति लगीन घाई

42

🔸मात्र उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीसाठी जि.प.शिक्षण विभागाची अति दिरंगाई

🔹उच्च्श्रेणी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख पदोन्नती त्वरीत करा – महा.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12जुलै):-महा.शासन ग्रामविकास मंत्रालयाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी बदली पोर्टल ॲप तयार करुन सदर ॲप वर जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी स्वतची शिक्षक माहिती विहीत मुदतीत अपडेट करण्याची सुचना जिल्हा परिषद प्राथमिक विभागांनी दिली. त्यानुसार सर्व शिक्षकांनी वैयक्तिक माहिती अपडेट सुदधा केली.

बदली पोर्टल वर सर्व जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांनी फेज 1 मध्ये फक्त् प्रोफाईल अपडेट करुन माहिती सबमिट करणे व प्रोफाईल अपडेट करतांना जी माहिती बरोबर आहे जी जशीच्या तशी ठेवून प्रोफाईल मध्ये विशेष करुन सध्याचे शाळेतील रुजू दिनांक,अखेरची बदली कॅटेगिरी, अखेरचा बदली प्रकार,हे बदल करणे महत्तवाचे आहे असे सुचित केले होते त्यासाठी 5 जुलै 2022 अखेरची दिनांक असतांना प्रत्येक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना मान.शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दबाव तंत्राचा वापर करुन लवकरात लवकर माहिती भरुन accept करायला अति घाई करुन शिक्षकांकडून बदली पोर्टल वरची माहिती परिपूर्ण करुन घेतली.

बदली पोर्टल चे काम विहीत मुदतीत झाले त्याबददल प्राथमिक शिक्षण विभागाचे अभिनंदन .मात्र उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांचे अंदाजे 57 ते 80 पदे रिक्त् असतांना सदर पदे भरण्यासाठी मान.शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी तत्परता दाखवितांना दिसत नाहीत. आज जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांचे काम प्रभारी मुख्याध्यापकांना करावे लागत आहे. परिणामी अनेक सेवा जेष्ठ शिक्षक आपले विषयाचे अध्यापन करुन मुख्याध्यापकाचे काम करीत आहेत. आजमितीस मुख्याध्यापकांना ऑनलाईनचे कामांचा प्रचंड ताण आहे. रोजच्या रोज कामांच्या यादीचा ससेमिरा सुरु आहे. विस्तार अधिकारी शिक्षण ची 35 पदे रिक्त् आहेत. केंद्रप्रमुखांची 91 पदे रिक्त् आहेत. एवढा रिक्त पदांचा डोंगर आवासून उभा असतांना जिल्हा परिषद चंद्रपूर प्राथमिक शिक्षण विभाग उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांची फाईल निकाली काढण्यासाठी 5- 6 महिनेचा विलंब लावतात आणि वारंवार त्रुटया दाखवून फाईल सामान्य प्रशासन विभागातून परत येत आहे याचे कारण काय असावे. गोपनीय अहवाल जोडले नाही, जन्मतारीख चुकीची आहे, अशा क्षुल्ल्क चुकांसाठी त्रुटया दर्शवून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली जाणे म्हणजे जाणून बुजून पदोन्नती प्रक्रिया लांबविण्याचा तुघलकी प्रकार दिसुन येत आहे.

बदली पोर्टल माहिती भरण्यासाठी जी तत्परता प्राथमिक शिक्षण विभागाने दाखविली तशीच तत्परता उच्च् श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी दाखवावी व लवकरात लवकर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय प्रदान करावे अशी एका निवेदनादवारे मागणी महा.पुरोगामी शिक्षक समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर, महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, महिला मंच सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, महिला मंच कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन,महिला मंच कोषाध्यक्ष लता मडावी, महिला मंच उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर,महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.