शहरासह ग्रामीण भागात सुरळीत विद्युत पुरवठा करा

🔸आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13जुलै):- दि. १२ जुलै मंगळवार रोजी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातील विद्युत विषयक प्रश्न सोडविण्याकरिता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉनफरसिंग द्वारे बैठक घेऊन ग्रामीण भागासह शहरातही सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश दिले.

गंगाखेड मतदारसंघात सतत पाऊस सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणचे विद्युत पोल झुकले असल्याकारणाने गावांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या अनेकदा तक्रारी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे येत होत्या. त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गुट्टे यांनी आज महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेटली. सततच्या पावसाने झुकलेले पोल व धोकादायक परिस्थितीत असलेल्या तारा सुस्थितीत करून सुरळीत वीज पुरवठा कसा देता येईल याकडे लक्ष द्या, थोडाफार पाऊस किंवा वारा सुरू झाल्यानंतर रात्री अपरात्री लाईट बंद करू नका, फॉल्ट झाला आहे

या नावाखाली जास्त वेळ विद्युत पुरवठा खंडित करू नका जर का कुठे थोडीफार बिगाड झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून द्या, सर्वत्र ए.बी. स्वीच बसवा, वीज बिल वसुलीसाठी सक्ती करू नका, ग्राहकांना आधी पूर्व सूचना द्या, मेंटेनन्स ची कामे तात्काळ मार्गी लावा, शेतकऱ्यांना विद्युत ट्रान्सफॉर्मर वेळेवर द्या, सध्या पावसाळ्यामध्ये गावठाणच्या अनेक समस्या समोर येत आहेत त्यामुळे गावठाणचा विद्युत पुरवठा अधिककाळ बंद ठेवू नका. शहरातील रहदारीस अडथळा ठरणारे रस्त्यातील पोल तात्काळ बाजूला काढा व ट्रांसफार्मर सुस्थितीत ठेवा, गंगाखेड शहरात ९ ए.बी. स्विच बसवले असून उर्वरित ५ ए.बी. स्विच तात्काळ बसवा, जे नागरिक वेळेत व रेगुलर वीज बिल भरणा करतात त्यांच्यासाठी आपण काही वेगळी तरतूद केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत देऊळगाव दुधाटे ता. पूर्णा येथील नागरिकांचा विजेसाठी सतत फोन येत असतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या असे या बैठकीत आ. गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

या बैठकीस महावितरण गंगाखेडचे अधिकारी श्री वाहूळे, श्री बासळकर, श्री शोहेब आली, पालमचे श्री कौरवार, पूर्णेचे श्री खोपडे व श्री राठोड उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED