पाऊसामुळे घराचे नुकसान, संकटात सापडलेल्या परीवारांना आर्थिक सहाय्य मिळावे – ब्रिजभूषण पाझारे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.१६जुलै):-(चंद्रपूर) सतत झालेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र हाहाकार गाजवला आहे. प्रत्येक राज्यात जिल्हात मुसळधार पाऊसामुळे अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. आपल्या चंद्रपूर जिल्हात देखील अनेक परिवारांच्या घराचा भिंती कोसळलेल्या आहे. अनेक जन जखमी देखील झालेले आहे. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात घरे कोसळले असून परिवारांचे मोठे नुकसान झाले आहे. काही लोकांना स्थलांतर देखील करण्याची गरज भासत आहे. त्यामुळे आज माजी जिप समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी चंद्रपूर तहसीलदार साहेबांची यांची भेट घेऊन घरे पडलेल्या परिवारांना आर्थिक सहाय्य करण्यास विनंती पत्र सादर केले आहे.

चंद्रपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा माजी अर्थनियोजन मंत्री मा.आ. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचाशी पूरपरिस्थितीबाबत चर्चा केली . बंगाली कॅम्प परिसरात झालेल्या नुकसानी बाबतीत शासन मार्फत आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने व त्यांचा मार्गदर्शनाखाली आज चंद्रपूर तहसीलदार कार्यालयात हजेरी लावली तथा विनंती सादर केली. यावेळी राकेश बोम्मावार, अमित निरांजने, सारिकाताई संदूरकर, आकाश मस्के यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED