नांदा येथील “त्या” गरोदर मातेचा वेदनादायी रेल्वेने प्रवास

30

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.18जुलै):- सपुर्ण चंद्रपूर जिल्हात   गेल्या सात ते आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही पुरस्थीती जैसे थे असल्याचं दिसतं आहे.मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.सर्वसामान्य नागरिकांना विविध समस्या ला तोंड द्यावे लागत आहे,कोरपना तालुक्यातील नांदा येथील  रंजनी सुरेश तलांडे  या गर्भवती महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा चे आशा वर्कर लता गेडाम यांना मिळताच कोणताही विलंब न करता आटो रिक्शा ने तिला ग्रामीण रुग्णाल गडचांदुर येथे नेण्यात आले होते.पण तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी चंद्रपूर ला जाण्यासाठी सांगितले.परंतु पुरामुळे  मुख्यमार्ग बंद असल्याने  तिला रेल्वे स्टेशन मानीकगड वरुन रेल्वे च्या डब्यात शौचालय च्या बाजुला खाली बसुन तिला बल्लारशहा स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागला. बल्लारपूर स्टेशन वरून शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे पोहचताच तिने  जुळ्या गोंडस बाळास जन्म दिला आहेत.

ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करा

कोरपना व जिवती तालुक्याच्या मध्यवर्ती भागात गडचांदूर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिदुर्गम भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात, मात्र सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतेक रुग्णांना चंद्रपूर येथे पाठविले जाते, त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, तेव्हा ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी आहे.