महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना संचलित तालुका व शहर साप्ताहिक पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

45

✒️चाळीसगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चाळीसगाव(दि.18जुलै):-महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना संचलित चाळीसगाव तालुका व शहर साप्ताहिक पत्रकार संघाची बैठक रविवार दि 17 जुलै  रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ,चाळीसगाव येथे संपन्न झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे व प्रदेश प्रवक्ते तारकेश्वर परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारणी याप्रसंगी जाहीर करण्यात आली.सदर  कार्यकारिणी ही 2022-23 जुलै पर्यंत राहणार आहे.

संघटनेच्या नूतन तालुकाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी तर शहराध्यक्षपदी विशाल कारडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी चाळीसगाव तालुका साप्ताहिक पत्रकार संघाची कार्यकारणी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी जाहीर केली यात तालुका उपाध्यक्ष म्हणून कैलास सूर्यवंशी,तालुका सचिव योगेश्वर राठोड, तालुका सहसचिव संजय मिस्तरी, तालुका खजिनदार यश पालवे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जाकीर मिर्झा, तालूका सदस्य मयूर अमृतकार ,सत्यजित पाटील,तालुका सल्लागार विजय सपकाळे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहराध्यक्ष विशाल कारडा यांनी देखील  शहर उपाध्यक्ष अश्पाक पिंजारी ,शहर सचिव पराग सोनार ,शहर प्रसिद्धीप्रमुख देवेश पाटील ,सदस्य नीलकंठ साबणे ,शहर सल्लागार भूरन घुले यांची निवड केली.

या बैठकीत राजेंद्र चौधरी, विजय सपकाळे,भुरन घुले तारकेश्वर परदेशी, योगेश्वर राठोड ,कैलास सूर्यवंशी, देवेश पाटील, निळकंठ साबणे यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना वाढीसाठी आम्ही सर्व सदस्य, पदाधिकारी सदैव कार्यशील राहणार आहोत असे प्रदेश प्रवक्ता तारकेश्वर परदेशी यांनी सांगितले .महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जाहीर अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात व महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेचे ध्येय उद्दिष्टांबद्दल मार्गदर्शन केले. व जनतेच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी देखील संघटना कायम अग्रभागी राहणार आहे.असेही प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे यावेळी म्हणाले.