_अड्याळ / पहेला परिसरातील वारंवार होणारा विजेचा लपंडाव व बिलात येणारे अतिरिक्त शुल्क रद्द करा त्वरित रद्द करा :- याकरिता मुख्यमंत्री, ऊर्जा नियामक आयोग, पोलीस स्टेशन शाखा अभियंता यांना निवेदन

28

🔸जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स चा पुढाकार

✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भंडारा जिल्हा भंडारा – अड्याळ- पहेला परिसरातील वारंवार होणारा विजेचा लपंडाव त्वरित थांबवण्यात यावे ., त्याचप्रमाणे विद्युत बिलामध्ये येणारे अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात यावे, याबाबतचे निवेदन जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य नियामक आयोग एम. एस. ई .बी .मुंबई , अड्याळ पोलीस स्टेशन ,शाखा अभियंता विद्युत वितरण कंपनी अड्याळ, उपकेंद्र विद्युत वितरण कंपनी पहेला यांना देण्यात आले .

निवेदनात नमूद की ,
पावसाळा सुरू असून आणि वीज रात्री- बेरात्री दिवसातून केव्हाही जात असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, शाळा, व्यापारी, बँका, कार्यालय, घरगुती वीजधारक यांच्यामध्ये विद्युत वितरण कंपनी बद्दल असंतोष निर्माण झालेला आहे .ही असंतोषाची लाट जन आक्रोशामध्ये केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीकडून लॉकडाऊन काळात दिनांक 1 एप्रिल 2020 पासून 20% विज दर वाढ करण्यात आली होती .त्यामुळे महागडी वीज फक्त महाराष्ट्र राज्यात आहे .वीज भाव वाढ केल्यामुळे शासनाने जनतेची एक प्रकारे लूट केलेली आहे. ती लूट तात्काळ थांबवण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्युत बिलामध्ये जो अतिरिक्त शुल्क रद्द लावला जातो तो बंद करण्यात यावा .ही एक प्रकारची जनतेची लूट आहे. दिल्ली व पंजाब राज्यात 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाते आणि महाराष्ट्रात विजेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा महाराष्ट्रात का दिली जात नाही? हा एक सर्वसामान्य जनतेसमोर निर्माण झालेला चिंतेचा विषय आहे .

त्यामुळे शासनाने व संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करून त्वरित समस्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अन्यथा जनता केव्हाही रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही .असा इशारा जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे राष्ट्रीय सचिव संजीव भांबोरे, भंडारा जिल्हा जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे अध्यक्ष कुलदीप गंधे, सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे अड्याळ , सामाजिक कार्यकर्ते पहेला विलास बांडेबुचे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात केलेली आहे.