ब्रह्मपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा – गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी आदर्श टेलर यांची मागणी

106

🔹शोषित पीडित वंचित दलित अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ब्रह्मपुरी नेहमी एक पाऊल आवाज उठवण्यासाठी पुढे आहे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 19जुलै):-ब्रम्हापुरी तालुक्यातील गावांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने धान, कापूस, सोयाबीन, तूर, अशा पैसे मिळवून देणाऱ्या पिकांसह पालेभाज्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आदर्श नावाने परिचित असणारे व गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी, यांनी केली आहे.अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओला दुष्काळाचे चिन्ह निर्माण झाले आहे.

मोठ्या प्रमाणात भात पिकात पाणी आल्याने शेतकऱ्यांची धानाचे परे कुजून गेली. यामुळे शेतकरी राजा यावर्षी पाऊस पडूनसुद्धा समृद्ध दिसत नाही. यंदा जुलै महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अजून थांबायला तयार नाही. त्यामुळे बंधारे, तलाव, तळी, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. व अनेक ठिकाणी घरे व पिकेसुद्धा अति पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी सोयाबीन,धान, कापूस,तुर ही पिके मोठ्या प्रमाणात करतात. ही पिके अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी शेतीच्या खर्चाने अक्षरशः कर्जबाजारी होत चालला आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी.व ब्रह्मपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी गुरुदेव भक्त नामदेव ठेंगरी ब्रह्मपुरी , यांनी केली आहे.