द्रौपदी मूर्मू यांची राष्ट्रपती पदी निवडीबद्दल भाजपतर्फे गडचिरोलीत जल्लोष

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि. 22जुलै):-भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक दि. 18 जुलै रोजी संपन्न झाली आणि आज दिनांक 21 जुलै ला निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू यांची निवड करण्यात आली . त्यामुळे गडचिरोली जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यासाठी आम. डॉ. देवरा होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात जल्लोष काढून आनंद व्यक्त करण्यात आला.

द्रौपदी मूर्मू ह्या आदिवासी समाजातील महिला असुन त्या समाज कार्यात सदैव अग्रेसर होत्या. त्यामुळे आदिवासी समाजातील आमदार – खासदारांना खूप आनंद झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आणि इतर अनेक राजकीय पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मूर्मू यांना मतदान केल्याने भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत.जल्लोष कार्यक्रमात आम. डॉ देवराव होळी, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे , रमेश भूरसे, प्रकाश गेडाम, सारडा, साळवे, गिता पूंगाटी, विजय सेडमाके, विनोद देवोजवार नैताम मॅडम आदी सहीत भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED