घुग्घुस नगरपरिषद मध्ये स्थायी प्रशासक नियुक्त करा… आम आदमी पार्टी घुग्घुस

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.22जुलै):-नगरपरिषद घोषित होऊन दीड ते दोन वर्ष लोटून गेलेले आहेत .परंतु अजूनही इथे स्थायी प्रशासक/मुख्याधिकारी नियुक्त नसल्यामुळे गावातील नागरिकांच्या कामामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहे. सद्ध्या स्थिती पाहता बांधचे दरवाजे सोडलेले असल्यामुळे घुग्घुस परिसराला लागलेल्या वर्धा नदीला पूर आलेला आहे ज्यामुळे एकीकडे घुग्घुस गावातील शिवनगर, शास्त्रीनगर व आंबेडकर नगर मध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे व दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या नळाला मागील चार दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही यांसारख्या खूप समस्या आहे.इथे येत असलेले मुख्याधिकारी नियमित नगरपरिषद मध्ये बसत नसल्यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत.मागील मुख्याधिकारी अर्शिया जुही या गावातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवित होत्या हे बघता येथील प्रस्थापित राजकीय नेत्यांनी दबाव आणून त्यांची बदली महविकास आघाडीची सरकार असताना केली ही खूप दुर्दैवी बाब आहे.

याची दखल घेता आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी येत्या 07 दिवसांमध्ये घुग्घुस नगरपरिषद इथे स्थायी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार चंद्रपूर यांच्या कडे केली अन्यथा आठव्या दिवशी आंदोलन करू अशी चेतावणी दिली.यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED