सावरगाव येथे पीक परिसंवादाचे आयोजन

31

✒️माजलगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सावरगाव(दि.23जुलै):-कृषी विभाग,जैन इरिगेशन सिस्टीम व गुंजकर ॲग्रो एजन्सीज् माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे शेतकरी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ठिबक सिंचनाची निवड व देखभाल, स्वयंचलित ठिबक पद्धत, उती संवर्धित उत्पादने, पाण्याचे व खतांचे पीक व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

ठिबकद्वारे योग्य पद्धतीने खत व पाण्याचा वापर केल्याने उत्पादनात कमालीची वाढ होऊन पाण्याचा अपव्यय कमी होत असल्याने या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहन मुटकुळे यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम चे कृषी शास्त्रज्ञ संजय मुटकुळे, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर याबाबत सेल्स इंजिनिअर सुरेश अवचार यांनी मार्गदर्शन केले, यावेळी उपस्थितीत अप्पासाहेब जगताप, विष्णू नाईकनवरे, रामभाऊ नाईकनवरे, निळकंठ नाईकनवरे, सुधाकर जगताप, प्रकाश गायकवाड, हनुमंत जगताप, दिनकर नाईकनवरे अरुण नाईकनवरे सह इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.