प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न!

28

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.24जुलै):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारे संचलित प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी उन्हाळी २०२१ चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ पी एच सूर्यवंशी होते. प्राचार्य व महाविद्यालयातील शिक्षकाच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

संत गाडगेबाबा प्रतिमा व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक भाषणातून संयोजक डॉ व्ही ए चौधरी यांनी समारंभाची रुपरेषा विषद केली. या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ नितीन टाले विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमूर्त महोत्सवात सजग नागरिकत्वाचे आव्हान पदवीधर युवकांनी समर्थपणे पेलावे असे प्रतिपादन डॉ सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय संशोधनातून केले. प्रा विवेक चौधरी, डॉ नितीन टाले, डॉ.चंदा जगताप, डॉ.अनिता सोनुले, डॉ.रमेश जाधव, डॉ.राजेश मेश्राम, डॉ.निलेश गोरे, प्रा. गौतम सातदिवे, प्रा गजानन काकडे, प्रा कांचन दुधे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश फुके यांनी केले तर प्रा. गौतम सातदिवे यांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन धांडे व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातुन संपन्न झालेल्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.