बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.24जुलै):-चंदन तस्करांना आय.पी.एस पंकज कुमावत यांनी चांगला दणका दिला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातून तब्बल 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह जवळपास 20 लाख 72 हजरांचा ऐवज जप्त केला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातील काही जण चंदनाची तस्करी करत असून त्यांनी शिवारातील शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणले आहेत आणि आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा काढून चोरटी विक्री करत आहेत, अशी माहिती आयपीएस कुमावत यांना मिळाली होती.

पोलिसांकडन मिळालेल्या माहितीनुसार पंकज कुमावत यांच्यासह टीमने महाजनवाडी गावात छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा अशोक रामहारी घरत रा . महाजनवाडी हा मिळून आला. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, 499 किलो चंदनाचा तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला.

दरम्यान याप्रकरणी चंदन तस्कर अशोक घरत याच्यासह 10 जणांविरुद्ध बीडच्या नेकनूर ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने चंदन तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Breaking News, क्राईम खबर , बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED