ज्योती क्रांतीच्या परिषदेच्या महाराष्ट्रातील संघर्ष रथयात्रेमुळे ओबीसी आरक्षण पूर्ववत: अशोक ननवरे

36

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.24जुलै):-स्थानिक स्वराज्य संस्थेतील 27 टक्के आरक्षण हे खरे तर महाराष्ट्रभर ज्योती क्रांती परिषदेने संघर्ष रथ यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना जाग करण्याचं काम ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश आप्पा बारसकर यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ओबीसी समाजावर अन्याय होत आहे .तो आम्ही सहन करणार नाही. म्हणून महाराष्ट्रभर संघर्ष रथ यात्रेच आयोजन करून मुंबईतील आझाद मैदानावर ती विराट ओबीसी बांधवांना घेऊन आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला यश आलं.

महाराष्ट्रातील खेड्यामध्ये राहणार ओबीसी समाज व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणामुळे राजकारणात स्थान मिळत होते मात्र न्यायालयाने इम्पोरिकल डाटा सादर करेपर्यंत ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण स्थगिती दिल्याने ओबीसी समाज राजकारणापासून वंचित झाला होता. यासाठी महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक समाजाचा इम्पोरियल डाटा न्यायालयात सादर करावा यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने व रमेश आप्पा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याचे ठिकाणी आंदोलने ,मूक मोर्चा ,रथ संघर्ष यात्रेचे माध्यमातून आंदोलन करण्यात आली.

चौकट
स्थानिक स्वराज्य संस्थेतील 70 टक्के आरक्षण ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश आप्पा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन संघर्ष रथ यात्रा व आझाद मैदान वरील आंदोलनाची दखल घेऊनच ओबीसी बांधवांना सरकारने 27 टक्के आरक्षण जाहीर केलं.आरक्षण मिळाल्यानंतर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने कूरूल नगरीमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.ज्योती क्रांती परिषदेचे शाखाध्यक्ष कुरुल: अशोक ननवरे, रोहित गायकवाड

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी बांधवांना २८/टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले . ओबीसी बांधवांच्या वतीने कुरुल मध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शाखाध्यक्ष अशोक ननवरे उपाध्यक्ष रोहित गायकवाड ,दिगंबर शिंदे,धनाजी माळी, पांडुरंग माळी, व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते