राजगुरुनगर तालुक्यातील आसखेड बु.येथील तीन शेळ्यावर लांडग्याचा हल्ला

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि.२५जुलै):-राजगुरुनगर लांडग्याच्या हल्यात तीन शेळया ठार…

आसखेड बु येथे तीन शेतकर्याच्या शेळ्यावर लाडग्यानी हल्ला करुन ठार केले, या घटनेनंतर गावात भिती चे वातावरण पसरले आहे, दि 23 जुलै दुपारी 12 वाजल्या पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लाडग्यानी वेगवेगळ्या तीन शेतकर्याच्या शेळ्यावर हल्ला केला या मध्ये सकाळी तुकाराम तांबे यांच्या बांधलेल्या शेळ्यावर हल्ला केला लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर लांडगा तेथुन पळून गेला,दुपारी वंदना तांबे यांची शेळी डोळयासमोर ओडून नेली आणि संध्याकाळी चद्रकांत सोंडेकर यांचा बोकडावर हल्ला करून ठार मारले.

ह्या हल्यानंतर आसखेड बू उपसंरपच सागरभाऊ तांबे यांनी तात्काल वनविभाग प्रशासकीय अधिकारी यांना फोन करून तात्काल घटनेची माहिती दिली, आणि लांडग्याचा बंदोबस्त करावा असे ग्रामस्थां तर्फे आव्हान केले ह्या वेळी कालिदास तांबे माजी उपसंरपच बाबाजी सोंडेकर, सचिन तांबे, प्रविण तांबे, माजी संरपच दत्ता तांबे. आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED