ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे कारगिल विजय दिवस साजरा

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि. 26जुलै):-कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने नेवजाबाई हितकारणी विद्यालय नवेगाव पांडव येथे भाषण स्पर्धा घेण्यात आली. कारगिल विजय दिवसाचे महत्त्व या विषयांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयातील एनसीसी कॅडेट्स यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यानिमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. एस. ठाकरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील शिक्षक श्री.जी.डब्ल्यू. नीपाने सर, श्री मुनिराज कुथे सर, श्री.सतिश डांगे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या भाषण स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थांनी कारगिल विजय दिवसाचे महत्व समजावून सांगितले. भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहास या निमित्ताने विद्यार्थ्यानी मांडला. भारतीयांच्या जीवनात सैनिकांचे किती मोठे योगदान आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे सर यांनी एनसीसी च्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करत त्यांनी सैन्यामध्ये जरूर सामील व्हावं हा आशावाद व्यक्त केला.या कार्यक्रमाचे निमित्ताने प्रमूख अतिथी श्री. मुनिराज कुथे व श्री.सतिश डांगे यांनी सुध्दा आपले मत मांडले.

या संपूर्ण कार्यक्रमच्या आयोजनासाठी विद्यालयातील एनसीसी शिक्षक श्री.नरेंद्र चुर्हे यांनी विशेष मेहनत घेतली .त्यांनी या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमालाश्री.ललित महाजन सर,श्री वी. के. बेदरे सर,श्री. एम.आर. हेमके सर,शिपाई बंडू फुकट
आदी कर्मचारी उपस्थीत होते.