पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शवविच्छेदनगृहासमोर बसविले सिमेंट बेंच

40

🔹शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम 

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 27 जुलै):-शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहासमोर मृतकांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिमेंट बेंच शवविच्छेदनगृहासमोर बसविण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुग्ध अभिषेक करून दीर्घ आयुष्यासाठी पूजन करण्यात आले.

आणि रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या वाढदिवशाचे औचित्य साधून सर्व तालुक्यातील शिव सेविकांनी शपथ घेत आम्ही सर्व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहु असे सांगण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश मांडण, डी.डी. गारोळे, शिवसेना सह संपर्क प्रमुख चितंगराव कदम, उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर, उपजिल्हाप्रमुख बळीराम मुटकुळे, तालुकाप्रमुख सतीश नाईक, शहर प्रमुख संदीप ठाकरे, माजी नगरसेवक गजेंद्र ठाकरे, विनायक कदम, कपील पाटील चव्हाण,गजानन सोळंके, संजय पळसकर, वसंतराव देशमुख, राजू कवाने, अनिल कांबळे, नितीन देशमुख, अमोल तीवरंगकर, कृष्णा जाधव, अभिजीत चौधरी, गोपाल कलाने,अमोल नरवाडे, बसवेश्वर शिरसागर,बालाजी लोखंडे सह तालुक्यातील शिवसैनिक युवा शिवसैनिक उपस्थित होते.