वडगाव स्टेशन ते हरंगुळ रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष.

110

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27जुलै):- तालुक्यातील हरंगुळ येथील यात्रा मराठवाड्यातील तीसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा मानली जाते, दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सप्ताहात नागपंचमीच्या दिवशी भरते,या यात्रेला बिड, परभणी, नांदेड व लातुर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात,कोरोणा काळानंतर दोन वर्षांनी यात्रा भरत असल्याने, या वर्षी भाविक भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हरंगुळ देवस्थान कमिटी वर सध्या प्रशासकीय अधिकार आहे, परंतु देवस्थानच्या परिसरात साचलेली घान यात्रा जवळ येऊन ठेपली तरीदेखील, स्वच्छता करण्यासाठी कांहींच हालचाल केली नाही, भाविक भक्तांना यात्रेला येण्यासाठी रस्त्यावर वाढलेल्या झाडे झुडपे, रस्त्याची दुरावस्था झाल्याने मोठी अडचण होणार आहे,या पार्श्वभूमीवर शासनाने, रस्त्यावरील झाडे झुडपे काढणे महत्त्वाचे आहे

प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय,सध्या पाऊस सुरू असल्याने, रस्त्याची तात्काळ रस्ता दुरुस्ती करून, परिसरातील स्वच्छता करणे गरजेचे आहे, परिसर स्वच्छ करून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना निवारा करणे गरजेचे आहे, महसूल विभाग गंगाखेड यांनी हरंगुळ देवस्थान यात्रा उत्सवात भाविकांची हेळसांड व गैरसोय होऊ नये,याची दक्षता घ्यावी व गंगाखेड पोलिस ठाण्याचे इन्चार्ज पोलिस निरीक्षक साहेबांनी, यात्रेसाठी पोलिस प्रोटेक्शन देण्याची कृपा करावी, अशी हरंगुळ देवस्थान येथील प्रतिष्ठानची मागणी आहे.