कोरेगाव भीमा आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, दादर चे चैत्यभूमी वा नाला सोपाऱ्याचे सुप्पारक असे नामांतर करा

78

🔸नव्या मुखमंत्र्या कडे डेमोक्रॅटिक रिपाई ची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.28जुलै):- 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव जातीय हिंसाचारातील बौद्ध आंबेडकरी आंदोलक तरुणांवरील गुन्हे वापस घ्यावेत व दादर स्टेशनला चैत्याभूमी तर नालासोपारा स्टेशनला सुप्पारक असे नामांतर करण्यात यावे अश्या मागणीचा ईमेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविला आहे.*

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगल कामना व्यक्त करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या व पुढे म्हणाले की बौद्ध आंबेडकरी समाजा सह रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थन हवे असल्यास 1 जानेवारी 2018 रोजी मनुवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बौद्ध आंबेडकरी युवा आंदोलकांवर खोट्या केसेस दाखल करण्यात येऊन त्यांचे भविष्य अंधःकारमय करण्यात आले आहे. तात्काल त्या केसेस मागे घेऊन त्यांचा मार्ग सूकर करण्यात यावा.

शिवाय बौद्ध आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान असलेले पावन पूज्य चैत्यस्तूप दादर या ठिकाणी आहे, बौद्ध आंबेडकरी समाजाचे राज्यातील हे ठिकाण फार महत्वाचे आहे. म्हणून दादर रेल्वे स्टेशनला “चैत्यभूमी” तर नाला सोपारा हे महात्मा तथागत गौतम बुद्ध यांच्या पावन पद स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमिला बौद्ध प्रकांड पंडित सुप्पारक यांचे वास्तव्य होते व इतिहासात “नाला सोपाऱ्याचे” नाव “सुप्पारक” आढळते पुढे मात्र अपभ्रमश होऊन “सुप्पारक” चा नाला सोपारा झाला.

तथागत बुद्ध पद पावन स्पर्शलेल्या पवित्र नगरीस तसेच बौद्ध भिक्षु सुप्पारक यांचे निवास स्थान असलेल्या या धरतीला नाला सोपारा असे उच्चारून हिंनवल्याचा भास होतो अपमानस्पद प्रतीत होते, यामुळे पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक संघटनेच्या व रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने अशी मागणी करण्यात येत असल्याचा ईमेल पॅन्थर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिब पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.