पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना ईडीच्या गैरवापरा बद्दल निवेदन

32

✒️पालघर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पालघर(दि.२८जुलै):- पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी, पालघर यांना देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांच्या करिता निवेदन देण्यात आले. सध्या देशात केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावर ईडी व केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीने काम करत असून , वारंवार चौकशी साठी नोटीस बजावून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी मार्फत नाहक त्रास दिले जात आहे. ही एक प्रकारची दडपशाही असून, या हुकूमशाही व दडपशाहीच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोळे यांच्या आदेशाने राज्यात सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ईडीच्या बेबंदशाही विरोधात नित्यनियमित आंदोलने करण्यात येत आहेत.

पालघर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करण्यात येत असून निवेदन देण्याच्या वेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता अविश राऊत , महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश नम , किसान सेल प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील , सोशल मीडिया प्रदेश चिटणीस रोशन पाटील , जिल्हा वकील संघटना अध्यक्ष ऍड. सुधीर जैन , जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मोईज शेख व मधुकर चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील ,जिल्हा महिला अध्यक्ष सरयू औसरकर , जिल्हा सरचिटणीस रामप्रकाश निराला व भरत महाले,जिल्हा सरचिटणीस एड.मनोज दांडेकर , पालघर जिल्हा चिटणीस रामनरेश यादव , विक्रमगड तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी , पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर ,माजी जिल्हा सरचिटणीस नईम चौधरी , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष दीपिका वानखेड , अस्मिता वानखेडे , शहर उपाध्यक्ष मनीषा कालपून्ड , माजी शहर अध्यक्ष शैलेश ठाकूर , राजीव शुक्ला, मनोर शहर अध्यक्ष रविश नाचन व कार्यकर्ते उपस्थित होते.