एक ऑगस्ट रोजी विद्रोही कवी संमेलन

69

🔸विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे पुस्तकाचे प्रकाशन

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.28जुलै):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त… अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करण्यासाठी निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सुप्रसिद्ध कवी व लेखक विश्वास सुतार यांच्या अध्यक्षतेखाली 1 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर विद्रोही कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून डॉ. अमर कांबळे, प्रा. वसंत भागवत, संघसेन जगतकर, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. स्मिता गिरी, डॉ. शोभा चाळके, प्रा. अमोल महापुरे, प्रताप घेवडे, पंकज खोत, सतिश घुगरे, चंद्रकांत सावंत, विद्रोही कवी पी. के., सरकार इंगळी, रघुनाथ कापसे आदी कवी सहभागी होणार आहेत.

या कवी संमेलनाचे निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर हे आहेत तर या वेळी निवडक नव कवींना आपल्या विद्रोही कविता सादर करणाची संधी दिली जाणार असून सहभागी कवींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

या वेळी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांचा ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार असून निर्मिती प्रकाशन प्रकाशित प्रा. डॉ. बाबुराव गुरव लिखित विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी कवी व लेखक डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन अनिल म्हमाने, प्रा. डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, चंद्रनील सावंत, अनुष्का माने यांनी केले असून कवी व लेखकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.