प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा झेंडा विक्रीचा जिल्हास्तरीय शुभारंभ

45

✒️सचिन महाजन(जिल्हा प्रतिनिधी,वर्धा)मो:-9765486350

🔸जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम

🔹उपक्रमात सहभागाचे आवाहन

वर्धा(दि.6ऑगस्ट):-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना सुलभतेने झेंडे उपलब्ध होण्याकरिता ठिकठिकाणी विक्री केंद्र सुरु केले जात आहे. त्याअंतर्गतच आज वर्धा येथे जिल्हास्तरीय झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा माहिती अधिकार मंगेश वरकड उमेदचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.हर घर तिरंगा हा उपक्रम दि.13 ते 15 आँगस्ट या तीन दिवसात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 3 लाख 50 हजारावर झेंडे लावण्याचे नियोजन आहे. यात शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट, शाळा, महाविद्यालये आदी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे.

उपक्रमांतर्गत नागरिकांना सहजतेने कमी दरात झेंडे उपलब्ध व्हावे यासाठी उमेदच्या माध्यमातून बचतगटांद्वारे झेंड्याची निर्मिती व विक्री केली जात आहे. त्याअंतर्गतच जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते वर्धिनी विक्री केंद्र वर्धा येथे झेंडा विक्रीचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी बचतगटांद्वारा उत्पादित झेंड्यांची विक्री केली जातील.आपण प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजर करत असतो. तशाच उत्साहाने प्रत्येकाने हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरावर उपक्रम कालावधीत झेंडा लावावा. झेंडा लावतांना झेंड्याचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावे, असे यावेळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे यांनी सांगितले. यावेळी अनुश्री वानखडे, विलास झोटींग, हेमंत काकडे, गोपाल साबळे, संदीप कांबळे, उज्वल गुजर उपस्थित होते.

वर्धिनी विक्री केंद्रात झेंडे उपलब्ध जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या झेंड्यांची वर्धा शहरातील वर्धिनी विक्री केंद्र येथे झेंडा विक्री केली जात आहे. बतच गटांद्वारे उत्पादीत झेंडे गटांद्वारेच विक्री केली जात आहे. नागरिकांनी या विक्री केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रिडा स्पर्धेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट खेळाडूंशी साधला संवाद