नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी तर्फे भव्य आरोग्य शिबिर व वृक्षारोपण संपन्न

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

तळोधी (बा)(दि.8 ऑगस्ट):- अल्युमनी स्टूडेंट ऑफ जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षतेखाली दि. 6 व 7 आॕगस्ट 2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) च्या परिसरात दोन दिवसीय भव्य आरोग्य शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य शिबिर दोन दिवस ठेवण्यात आले होते. दिनांक 6 आॕगस्टला पहिल्या दिवशी नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व दुसऱ्या दिवशी विद्यालयाजवळील गावातील नागरिकांना या सेवेचा लाभ देण्यात आला. शिबिरात जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे डॉक्टर आहेत त्यांनी सेवा दिली व निःशुल्क औषध वाटप केले.

हा अत्यंत महत्त्वाचा सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्ष आपले सोबती आहेत. त्याकरिता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचा दृढ संकल्प करून विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रोप लावले व स्वतः लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. परिसरामध्ये एकूण 100-150 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी श्री. संदीप भस्के, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री. जितेंद्र रामगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कपिल कलोडे, विद्यालयाच्या प्राचार्या सुश्री मनी मिना, माजी संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण श्री. रवींद्र रमतकर, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.