तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव च्या माध्यमातून रान भाज्याचे महत्त्व व नजागृती उमरखेड कृषी विभाग व आत्मा चा स्तुत्य उपक्रम

69

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) यांच्यावतीने आयोजित रानभाजी महोत्सव शेतकरी बांधव यांच्यासाठी संजीवनी ठरला आहे . तालुका कृषी अधिकारी श्री गंगाधर बळवंत कर यांचे मार्गदर्शनाखाली बारा ऑगस्ट 2022 रोजी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून श्री नामदेव ससाने आमदार उमरखेड विधानसभा व्यासपीठावर उपस्थित होते तसेच त्यांनी नागरिकांना रान भाजी चे महत्व पटवून सांगण्यासाठी 1972 च्या दुष्काळामध्ये अंबाडी या रानबाजीने देशातील ग्रामीण जनतेला जगवले असे उदगार काढले. व कृषी विभागाचे कार्य विशेष असल्याचे अधोरेखित केले. सदर कार्यक्रम प्रसंगी माननीय तहसीलदार श्री आनंद देऊळगावकर यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक अतिवृष्टी संदर्भात मार्गदर्शन करून दिलासा देण्याचे प्रशासनाच्या वतीने शेतकरी बांधवांनाआश्वासित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भाऊराव चव्हाण तालुकाध्यक्ष आत्मा यांनी शेतकऱ्यांना रानभाज्याचे संवर्धन व जतन करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लिंबाळकर मंडळ कृषी अधिकारी यांनी रानभाज्याचे आयुर्वेदिक महत्त्व व रान भाज्या बनवण्याच्या पद्धती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व रान भाज्यांची संवर्धन करण्याचेआव्हान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत गुंडा रे कृषी पर्यवेक्षक यांनी केले तसेच श्री काशिनाथ डाकोरे कृषी मित्र मोहदरी यांनी “कृषी मित्र”हे शेतकरी आणि कृषी विभाग यामध्ये महत्त्वाचा दुवा असल्याचे उपस्थितांना सांगितले . सदर कार्यक्रमा मध्ये उपस्थित आत्मा सदस्य महेश्वर बीचेवर, देवानंद चव्हाण, पुनमचंद जैन, जटाळे, श्री जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, अतुल कदम पंचायत समिती कृषी अधिकारी उमरखेड, दिनकरराव देशमुख विडुळ, उमेश कोतेवार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रकाश पवार कृषी सहाय्यक यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री निशांत सोनटक्के (मंडळ कृषी अधिकारी ), श्री सुनील देशपांडे मंडळ कृषी अधिकारी, श्रीराम किसन शिंदे कृषी पर्यवेक्षक श्री गंगाधर मंगलवार कृषी पर्यवेक्षक श्री रत्नदीप धुळे (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ), श्री बाळानंद शिरसेवाड सहाय्यक अध्यिक्षक, श्री शिवाजी परतवाड , सोमनाथ जाधव, दिशांत घुगरे, भारत मोठे, अबाराव कदम, विवेक मुसने, राहुल कांबळे, जनार्धन कदम, जी व्ही कापसे,गजानन कमठेवाढ प्रकाश इंगळे, एस एम बडेराव,ए ए निमलवाढ जी एन बीरमवाढ कऱ्हाळे, फोपसे, बच्चेवार, कावळे, आर यु वाघमारे ,हनुमंते,रेखा लोंढे,सि डी गव्हाणे, डी एस केकान ,ढवळे, मेंडके, चिद्दरवार, कल्पना घुगरे, इतर कृषी सहाय्यक बांधव उपस्थित होते तसेच श्री अमोल जोगदंडे धनज, मनोज सूर्यवंशी कृष्णापुर ,विकास मुटकुळे वरुड बीबी अमोल मिरासे बाळदी , संतोष चव्हाण वाणेगाव, विष्णू इंगोले पिरंजी, तयूब अली मुळावा, बाबाराव जाधव चुरमुरा, संजय इंगळे विडुळ, गणेश शिंदे नागेश वाडी, संजय मोतीराम मुटकुळे वरुड बिबी कोमल सिंग आडे, राहुल गौतम कांबळे लिंगी संजय दत्त राठोड पिंपळगाव वैभव काशिनाथ कदम मरसुळ गिरीश येरावार ढाणकी विनोद देवराव मस्के गांजे गाव राजू हरिभाऊ काळबांडे मन्याळी तय्यब अली मुळावा, विजय नारायण गडपेवार टेंभूरदरा विदर्भ फार्स ऍग्रो प्रोडूसर कंपनी व इतर तालुक्यातील कृषी मित्र उपस्थित होते. तसेच उमरखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन उपस्थिती नोंदवली. सदर कार्यक्रमाचे व्यापक स्वरूपात प्रसिद्धीसाठी पत्रकार बांधव उपस्थित होते..