सोनेगाव बोरी येथे स्वातंत्र्याच्या अमॄतमोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.18ऑगस्ट)  -उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी येथे स्वातंत्र्याच्या अमॄतमोत्सवी वर्षानिमित्त सकाळी 7.15 वाजता गावात प्रभात फेरी काढण्यात आली. प्रथम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गावच्या प्रथम नागरिक मां सौ सुनिताताई जिवने सरपंच सोनेगाव बोरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर प्रभात फेरी शाळेच्या आवारात आली व महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळा व्य.स.अध्यक्षा सौ मुक्ताबाई भोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.उपस्थितांचे स्वागत,स्वागत गीताने व पुष्प देऊन करण्यात आले.याप्रसंगी गावचे उपसरपंच मां श्री अनुपजी नागपूरे, सदस्य मां श्री उमेश भोले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रा.पं.सचिव श्री देशमुख साहेब शाळा मुख्याध्यापक सौ मोरे मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED