75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर 75 वृक्षांचे रोपण करून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी च्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

69

🔸75 वर्षे स्वातंत्र्याचे 75 वृक्ष दिव्यदीपचे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.15ऑगस्ट):-दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर ब्रम्हपुरी व आजूबाजूच्या परिसरात 75 वृक्षांचे रोपण स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. दिव्यदीप संस्थेच्या वृक्षारोपणाच्या या उपक्रमासाठी पोलीस वसाहत खेड रोड ब्रम्हपुरी, बोंडेगाव- कुर्झा रोड ब्रम्हपुरी, मुस्लिम कब्रस्तान ब्रम्हपुरी,दुफारे लॉन जवळील शिवमंदिर ब्रम्हपुरी अश्या चार जागांची निवड करण्यात आली होती.

पोलिस वसाहतीत एकूण 75 वृक्षापैकी 25 वृक्ष लावण्यात आली. वसाहतीत वृक्षारोपण करतांना ब्रम्हपुरी चे ठाणेदार यादव साहेब , पोलिस वसाहतीतील इतर कर्मचारी त्याचबरोबर नगर परिषद ब्रह्मपुरीचे बांधकाम सभापती विलास विखार हे सुध्दा या निमित्ताने उपस्थीत होते. ठाणेदार यादव साहेबांनी संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेला शुभेच्छा दिल्य व नेहमी शक्य तेवढे सहकार्य करू असे आश्वस्त केले. संस्थेच्या अध्यक्ष डॉ.स्निग्धा कांबळे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

पोलिस वसाहतीत वृक्षारोपण झाल्यानंतर कूर्झा बोंडेगाव रोडवर 15 वृक्ष लावण्यात आले. त्यानंतर कब्रस्तान ब्रह्मपुरी येथे 25 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी इंतेजामिया कब्रस्तान कमिटी चे अध्यक्ष अश्फाकभाई शेख ,सचिव जमीलभाई खान ,उपाध्यक्ष वखारभाई खान हे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थीत कब्रस्तानच्या पदाधिकऱ्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या व कब्रस्तान मध्ये वृक्षारोपण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. वृक्षारोपण च्या चौथ्या नियोजित स्थळी म्हणजे दुफारे लॉन जवळील शिवमंदिर येथे 10 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी मंदिराच्या समितीचे अध्यक्ष कुंदन दुपारे हे सुद्धा उपस्थित होते. आजूबाजूच्या परिसरातील स्त्रियांनीसुद्धा संस्थेमार्फत होत असलेल्या उपक्रमाची दखल घेत सहभाग घेतला. अशाप्रकारे एकूण 75 वृक्ष लावून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी ने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. जे जे विद्यार्थी, गावातील नागरिक या उपक्रमात सहभागी झाले त्यांना संस्थेच्या वतीने वृक्षारोपणात सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

वृक्षारोपणाच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ स्निग्धा कांबळे,सचिव सतिश डांगे, कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे ,सहसचिव ॲड. आशिष गोंडाने,सदस्य संजय बिंजवे, सदस्य वसुधा रामटेके, सदस्य डॉ.ज्योती दुफारे, सदस्य लखन साखरे ,सदस्य मंगेश नंदेश्वर, सुबोध हजारे,नरेश रहाटे, ओमप्रकाश बोकडे,विद्या रहाटे,कुसुम विखार या सर्वांनी खूप मेहनत घेतली व संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.