पाच सरोवरांचे गेट उघडले महापूर येण्याची शक्यता

112

🔹प्रकल्प पुजारीटोला चे 13 गेट , संजय सरोवर चे 04 गेट,बावनथडी चे 06 गेट, धापेवाडा चे सर्व गेट,गोसेखुर्द 33 गेट

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.15ऑगस्ट):-दोन दिवसांपासून येणाऱ्या पावसाने, सर्व सरोवरांचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले आहे. नुकताच पूर ओसरत नाही तर पुन्हा महापूर येण्याची शक्यता दिसून येत आहे यात सर्व जनतेने व प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे. आज 15 ऑगस्ट 2022 वेळ 12 वाजताचा अहवाल सादर करण्यात आला आहे,प्रकल्पांची स्थिती दर्शविण्यात आली आहे.

प्रकल्प पुजारीटोला चे 13 गेट उघडले,विसर्ग(क्युमेक्स)1723.78, टक्केवारी 82.67,संजय सरोवर चे 04 गेट, विसर्ग(क्युमेक्स)857, टक्केवारी 77. 42, बावनथडी चे 06 गेट, विसर्ग(क्युमेक्स)532.50 , टक्केवारी 78.94, धापेवाडा फ्लो स्थितीत सर्व गेट उघडे विसर्ग(क्युमेक्स)1089.86, टक्केवारी 23.98, गोसेखुर्द 33 गेट, विसर्ग(क्युमेक्स) 17207.39 आणि कारधा लहान पुल ईशारा पातळी 245.00 मी. धोका पातळी 245.50 मी.सद्याची पातळी 246.38 मी.धोक्याच्या पातळीपेक्षा वर पाणी वाहत आहे.

भंडारा जिल्हात पडलेली पावसाची आकडेवारी भंडारा येथे 60मीमी ,पवनी 56.49मीमी , तुमसर 90मीमी , मोहाडी 113.20मीमी , साकोली 120मीमी , लाखनी 85 , लाखांदूर 48.20मीमी एकूण 572.80 मीमी अशाप्रकारे 128 % टक्के जिल्ह्यात सरासरी पाऊस पडला आहे. अतिवृष्टी झालेले मंडळ संख्या-30, सर्वाधिक पाऊस झालेले मंडळ- मांसळ ता. लाखांदूर (131.00 मीमी.) ,भंडारा जिल्ह्यातील, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली,लाखनी, लाखांदूर, यातील 54 गावांचा संपर्क तुटला आहे, सध्या परिस्थिती अतिशय धोक्याची दिसून येत असल्याने प्रशासनाने जनतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.