भगवतीदेवी विद्यालयात भवानराव देवसरकरच्या हस्ते ध्वजारोहण

🔹स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सादरीकरण सप्ताह

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.16ऑगस्ट):-देवसरी गावात प्रभात फेरी जयघोष करत नारे देत देवसरी येथे दि.15 ऑगस्ट 2022रोजी सकाळी 8 वा. ग्रामपंचायत व जि. प. शाळा देवसरी येथील ध्वजारोहण पूर्ण करून प्रभात फेरीचे आगमन विद्यालयात झाले.

यावेळेस जि. प. उच्च प्राथमिक शाळा देवसरीचे विद्यार्थी व आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी यांची विद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणात चिव चिव दिसत होती.

ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ, उमरखेड संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री भवानराव दादाराव देवसरकर पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळेस देवसरी गावातील तरुण युवावर्ग व प्रतिष्ठित मंडळी कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तथा देशभक्तीपर गीत भाषणे करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी केले.

या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात सेवा करत असलेले देवसरी गावचे सुपुत्र श्री रुपेश अशोकराव देवसरकर यांचा विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन गजानन पाटील देवसरकर उपसरपंच यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

तर कु.सानिका विनायकराव शिंदे वर्ग 10वा ही चित्रकला स्पर्धेत तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल श्री प्रदीप पाटील देवसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.

कु. सानिका शिंदे हिने गीत गायन केल्याबद्दल जि. प. उ. प्रा. शाळा देवसरीचे मुख्याध्यापक श्री पौळ सरांनी दोनशे एक रुपयांचे बक्षीस दिले. तसेच इंग्रजी मधून उत्कृष्ट भाषण कु. शिंदे जि. प. शाळा देवसरी हिस मिरासे सरांनी एकशे एक रुपये बक्षीस दिले.

या कार्यक्रमास वानरे सर, माने सर, शेख सर,सुरोशे सर, शिंदे सर, कबलेसर, पुरी महाराज, चेपुरवार मामा, जाधव पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लडवार सरांनी अतिशय बोलक्या शब्दात केले.

तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग शिरफुले यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED