मुप्टा टीचर्स असोसिएशनच्या पुणे जिल्ह्याच्या उच्च माध्यमिक विभाग अध्यक्षपदी प्रा. निलेश साबणे यांची एकमताने निवड

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.17ऑगस्ट):-शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या २५ वर्षांपासून आक्रमकपणे लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य स्तरावरील मुप्टा या शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा उच्च माध्यमिक विभाग अध्यक्षपदी प्रा. निलेश साबणे यांची संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य सतीश वाघमारे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड घोषित केली. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य सतीश वाघमारे , प्राचार्य हनुमंत चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र सचिव सय्यद मुस्तफा, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष प्रा. प्रमोद साळुंके, डॉ. शिरीष मोरे, प्रा.विनीत निर्मळे, प्रा. सचिन सुबाळकर, प्रा. स्फूर्ती देशपांडे, प्रा.जेजरथ चंदनशिवे, प्रा. सत्यभामा बिराजदार, प्रा. विजया दिघे, प्रा. उमेश सरगर, प्रा. विनोद महाजन, प्रा. नीता गायकवाड, प्रा. महेश पिसाळ, श्री. केदार शिंदे, श्री. अनिल राक्षे, श्री. रमाकांत आढारी, श्री. दत्तात्रय साठे, श्री. विजय कारकूड आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेजड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेने नुकताच ना. शरदचंद्र पवार, ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. मुप्टा ही आक्रमक अशी शिक्षक संघटना असून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठ स्तरावरील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदोदित कार्यरत असते. ही संघटना शासकीय, सरकारी व संस्थांकडून होणाऱ्या पिळवणुकी विरोधात काम करत असते.

शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, विविध पेन्शन योजना, अनुदान व भरती प्रक्रिया, वेतनाबाबतच्या समस्या, विविध स्तरावरील मान्यता, शिक्षक-शिक्षकेतर यांच्या विविध अडचणी व त्यांच्या समस्या यांसारख्या गोष्टींना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रा. निलेश साबणे यांची पुणे जिल्हा उच्च माध्यमिक विभाग अध्यक्ष पदी निवड केली आहे.

“मुप्टाची साथ म्हणजे, अन्यायावर मात” ही भूमिका संस्थेची आहे. त्यामुळे अन्याय होणाऱ्या प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने तातडीने संस्थेशी संपर्क साधावा असे आव्हान या वेळी करण्यात आले. संस्थाचालकांचा मुजोरीपणा या विरोधात तसेच अन्याय पीडित शिक्षक-शिक्षकेतरांना न्याय मिळवून देणे यासाठी संघटना कार्यरत आहे. प्रा. निलेश साबणे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED