गंगाखेड येथे श्री संत मोतीराम महाराज पुण्यतिथी साजरी

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18ऑगस्ट):-शके १७८९ चैत्र शुद्ध पंचमी इ.सइ शुक्रवार दि. ९ एप्रिल १८७६ रोजी दौलतरामजी काकांनी व सरुबाई काकांनी यांच्या पोटी श्री संत मोतीराम महाराज काकांनी यांचा जन्म झाला. अध्यात्मातून समाज उन्नती व्हावी याचा विचार करून सर्व तत्त्वाचे सार एक नामच आहे, म्हणून श्री संत मोतीराम महाराजांनी सतत कीर्तन करत समाज सन्मार्गाला लावला. जाती,धर्म, पंथ असा भेद न करता भक्ती मार्गी लागले. अध्यात्मचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून त्यांनी आपले सारे आयुष्य या कार्यासाठी कारणी लावले. महाराजांचा एकाच वेळी दोन गावात कीर्तन झाल्याचा चमत्कार समाजाने पाहिला आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी ईश्वर प्राप्ती होते. महाराज आषाढी कार्तिकी वारी, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, त्रिंबकेश्वर, आळंदी, पंढरपूरचा भंडारा ते नियमाने करत. श्रावण वद्य पंचमी रोज गुरुवार दि. २७ ऑगस्ट १९६४ रोजी दुपारी ३:३० वा. हरिनामाच्या गजरात आपला देह ठेवला यावेळी असंख्य वारकरी उपस्थित होते.

याचे अवचित्य साधत आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. रेखा गुट्टे यांनी श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड येथे आयोजित सप्ताह किर्तन सोहळ्यास उपस्थित राहून ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर व इतर साधुसंतांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी संत जनाबाईंच्या मंदिरातील श्री संत मोतीराम महाराज यांची समाधी सुशोभित करुन विधिवत पूजाअर्चा करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी श्री संत जनाबाई संस्थानाचे सचिव डॉ. दिनकरराव मुंडे, विश्वस्त ॲड. संतोषराव मुंडे, अनिल यानपल्लेवार, माया जगदीश तोतला, रवींद्र लांडगे यांच्यासह नगरसेवक राधाकिशन शिंदे, वैजनाथराव टोले, ह.भ.प. भगवान महाराज इसादकर, ह.भ.प. अच्युत महाराज किरडे, ह.भ.प. विनायक महाराज गुट्टे गुरुजी, ह.भ.प. माणिक महाराज नाव्हेकर, ह. भ.प. बाळू महाराज बहादुरे, ह.भ.प. नागेश महाराज भिसे, ह.भ.प. बाळू महाराज लटपटे, पांडू महाराज रेवनवार, महिला पुरुष भजनी मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.