बीजेपी विरुद्ध आप : मोदी मॉडेल आणि केजरीवाल मॉडेल

34

जगातील सर्वात विश्वसनीय व सर्वमान्य दैनिक ‘न्यूयॉर्क टाईम्स’ ने आज मनीष सिसोदिया यांच्यासह दिल्लीतील शाळेचे व शाळेतील मुलांच्या फोटोला पहिल्या पानावर मान देवून केजरीवाल सरकारचे जगासमोर अभिंदन केले आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ हे जगात सर्वात जास्त वाचले जाणारे आंतरराष्ट्रीय दैनिक आहे. केजरीवाल मॉडेल चे जगभरात होत असलेले कौतुक हे बीजेपीच्या ‘मोदी लाटे’ साठी खूप मोठा धक्का आहे यातूनच टीम केजरीवाल ला बदनाम करण्याच्या बीजेपी च्या अभियानाचा एक भाग म्हणून आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री व दिल्ली सरकारचे शिक्षण मॉडेल साकारणारे मानिषजी सिसोदिया यांच्या घरावर सी. बी. आय. च्या धाडी टाकण्यात आल्या.

आपण कमजोर पडलो तर विरोधकांना बदनाम करायचे, सी. बी. आय., ई. डी. च्या धाडी टाकून खोट्या केसेस उभे करायचे, न्यायालयात अश्या केसेस मुद्दाम प्रलंबित करून नाहक त्रास द्यायचा, आमदार खरेदी-विक्री करून सत्तेत राहायसाठी आटोकाट प्रयत्न करायचा आणि केविलवाण्या प्रयत्नानंतर जे हाती येईल त्यावर समाधान मानून आम्ही खूप काही मिळवलं याचा आव आणायचा ही बि. जे. पी. ची ‘चाणक्य नीती’ आता जनतेसाठी विरंगुळा झाली आहे.

आपल्या मित्रांसाठी दहा लाख करोड कर्ज माफ करणे हा जनतेच्या पैश्याचा दुरुपयोग नाही का? जगातील सर्वात मोठे पार्टी कार्यालय बनविण्यासाठी ‘चंदा’ देणारे आणि कर्ज माफ झालेल्या मित्रांचा नेमका सबंध काय? सी. बी. आय., ई. डी. च्या कारवाही फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवरच का? सी. बी. आय., ई. डी. च्या नोटीस मिळाल्यानंतर जर नेते बीजेपी त गेले किंवा आपली बोलीभाषा बदलविली (उदा. मनसे) तर सर्व पाप धुतल्या जातात का? बीजेपी च्या अनेक नेत्यांची संपत्ती ही झपाट्याने वाढलेली आहे, महाराष्ट्रातील तेहत्तीस करोड वृक्ष लागवडीची, जलयुक्त शिवाराची, सिमेंट रस्त्यांमधील भागीदार कंपन्यांची आणि गोसेखुर्द मधील घोटाळ्यांची चौकशी सी. बी. आय., ई. डी. कधी करणार?

देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था भिकेला लावणारी नोटबंधी, जगातील सर्वात मोठी बेरोजगारी, हिंसक जातीवाद, आर्थिक स्थिती कमकुवत असतांना मित्रांना माफ केलेले दहा लाख करोड, कोरोना महामारी मध्ये लागोपाठ जळणाऱ्या चीतेमुळे स्मशानभूमीतील वितळलेल्या धूरनलिका, ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू, जीवनावश्यक समजले गेलेले रेमडेसीवीर औषधे चोरून त्याचा साठा करणारे बीजेपी नेते, गंगेत वाहत फेकले गेलेले कोरोनाबाधितांचे शेकडो मृतदेह, मृतांचे खरे आकडे लपवून स्वताची पाठ थोपटणारे नेते, नुकत्याच झालेल्या पावसात वाहून गेलेले आत्ताच उद्घाटन झालेले रस्ते, शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी चिरडून टाकणारे, मिडिया खरेदी करून जो विरोध करेल त्यांचा आवाज दाबणारे हे बीजेपी चे ‘मोदी’ मॉडेल.

याउलट डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगत सिंह यांचा आदर्श ठेवून जनतेचा पैसा जनतेसाठी या ‘जनतेचे सरकार’ संकल्पनावर आधारित आम आदमी पार्टी चे सरकार जेव्हा सरकारी खजिना भरभराटीला ठेवून सर्वसामान्य जनतेला शिक्षण, आरोग्य, व रोजगार हे मोफत उपलब्ध करून देत आहेत तेव्हा जनतेला ‘मोदी’ मॉडेल व ‘केजरीवाल’ मॉडेल चे खरे रूप समजत आहे.

गुजरात, हरियाना यामध्ये लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीत दररोज वाढत असलेले आप चे प्रस्त बघून आता ‘मोदी’ मॉडेल ची हवा गुल झालेली आहे हे बीजेपी ला चांगलेच समजले आहे. सध्या भारतात सर्वात जास्त वेगाने पसरत असलेला ‘आप’ आणि जगभरात कौतुक होत असलेले ‘केजरीवाल मॉडेल’ मुळे बीजेपी च्या स्वयंघोषित चाणक्यांची झोप उडाली आहे. आणि म्हणूनच टीम केजरीवाल ला काहीही करून बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न सी. बी. आय., ई. डी. चा वापर करून करण्यात येईल हे आधीच अपेक्षित होते, ‘बीजेपी विरुद्ध आप’ लढ्यात ‘मोदी’ मॉडेलचे सोंग लोकांसमोर उघळे पाडून आम आदमी पार्टी ने तसाही विजय मिळविलाच आहे.

✒️प्रा.डॉ.अजय घनश्यामजी पिसे,संयोजक,चिमूर विधानसभा
आम आदमी पार्टी(मो:-९५०३०५६३५३)