श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे आयोजन

47

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.19ऑगस्ट):-पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील परमपूज्य श्री हनुमानगिरी महाराज यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचे उद्घाटन सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प.पू. श्री सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव यांनी दिली.

• पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, बँकऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव, व न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सेवागिरी मंदिराच्या आवारामध्ये दिनांक 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान रोज सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे 22 वे वर्ष आहे सोमवारी 22 ऑगस्ट रोजी महात्मा गांधीचे पणतू व गांधी विचारवंत तुषार गांधी हे 75 वर्षानंतर भारत गांधीच्या स्वप्नातील आहे का? या विषयावर व्याख्यान होणार आहे. सातारा येथील अभिनेते किरण माने यांचे ” माझा अभिनय प्रवास” या विषयावर दिनांक 23 रोजी होणार आहे.

तर 24 ऑगस्ट रोजी पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे संत तुकाराम महाराजांचीऑगस्ट रोजी पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे संत तुकाराम महाराजांची शिकवण’ या विषयावर गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांचे,’ महात्मा फुले यांचे काही नवे पैलू ‘ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत शुक्रवार दिनांक 26 रोजी पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामविकास काळाची गरज ‘ या विषयावर तर शनिवार 27 रोजी पुणे येथील मराठा आरमाराचे साहित्यिक व अभ्यासक अनिकेत यादव यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार ‘ या विषयावर व्याख्यान होणार व रविवारी ता. 28 रोजीपुणे येथील नामवंत कीर्तनकार ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप हे संत चरित्र या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

सोमवारी 29 रोजी परमपूज्य श्री हनुमान गिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी अकरा वाजता समाधीस महाभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला यशस्वीरिता पार पाडण्यासाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, सचिन देशमुख यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.