मुख्याध्यापक पदी निवड होताच प्रथम सन्मान खुर्चीवर मातोश्रीचा

37

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 22ऑगस्ट):-ज्ञानप्रकाश विद्यालय, सुकळी ता. उमरखेड ज्ञानदीप विद्यालय, बेलखेड येथून प्रमोद आनंदराव दुधे हे शिक्षक पदावरून ज्ञानप्रकाश विद्यालय, सुकळी येथे मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली असता मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर प्रथमतः आपल्या मातोश्री श्रीमती सुमित्राबाई आनंदराव दुधे यांना खुर्चीवर बसवण्याचा प्रथम सन्मान दिला.

हा एक उमरखेड परिसरात आगळावेगळा आदर्श निर्माण केला. आणि मातोश्रीचे कार्य सुद्धा अतिशय चांगले आहे.

पती निधनानंतर पाचही मुलांना शिक्षण आपल्या पतीच्या पेन्शनवर शिकून सर्वांना ज्याच्या त्याच्या कर्तव्याप्रमाणे नोकरी मिळाली. आईच्या सुसंस्कारामुळे (प्रमोद दुधे मुख्याध्यापक पत्नी प्रणिता गृहिणी) (प्रा. डॉ. अनिल दुधे पीएचडी व पत्नी प्रा. डॉ. संजीवनी पीएचडी) (प्रदीप दुधे लिपिक पत्नी अर्चना गृहिणी)( विष्णू दुधे शिक्षक पत्नी अश्विनी दुधे शिक्षिका) (डॉ. सचिन दुधे बीएएमएस एम.डी. व पत्नी माधवबाग क्लीनिक डॉ.प्रियंका बीएएमएस) पाचही मुलांना शिक्षण दिले. पाचही मुलं व सुनबाई कर्तव्यदक्ष निघाल्या ही एक दुधे परिवाराची जमेची बाजू आहे.

आज प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभा आहे. ही एक मातोश्री श्रीमती सुमित्राबाई आनंदराव दुधे यांच्यासाठी गौरवाची बाब आहे.
त्याचप्रमाणे मुख्याध्यापक प्रमोद दुधे यांचे कार्यसुद्धा विद्यार्थी प्रिय आहे.

मागील आठवड्यात एनएमएसएस चा निकाल लागला त्यामध्ये ज्ञानदीप विद्यालय, बेलखेड येथील दहा विद्यार्थी पास झाले. अतिशय परिश्रमपूर्वक गणित विषयाचे अध्यापन करतात.

व सर्व टिमला घेऊन चालवण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे.

व इतरही लोकाभिमुख त्यांची कार्यप्रणाली आहे. आपल्या मुख्याध्यापक पदाच श्रेय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांना ते देतात.