गिरीश गवळी वतीने नेत्र तपासणी मोफत शिबिर १३५ जणांची केली तपासणी ; चस्मे वाटप

36

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.25ऑगस्ट):-कुरुल (ता.मोहोळ) येथील गिरीश (आण्णा) गवळी मित्र परिवार यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू कृत्रिम नेत्र भिंगारोपन शस्त्रक्रिया व चस्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरास लायन्स क्लब,लायन्स मथुराबाई फतेहचंद दमानी हॉस्पिटल,लायन्स ब्रिजमोहन फोफलीया नेत्रलय,जिल्हा अंधत्व निवारण समिती सोलापूर यांचे सहकार्य लाभले.यामध्ये मोफत १३५ जणांची केली तपासणी करुन चस्मे वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी मरिआईवाले समाज महाराष्ट्र अध्यक्ष दगडू निंबाळकर,माजी सरपंच मुसाहजरत पाटील,माजी उपसरपंच कांतीलाल माळी,प्रा बावळे सर,बाळासाहेब माने,ग्रा.पं सदस्य योगेश पटकळे,माजी ग्रा.पं सदस्य राजेंद्र आवारे,अंकुश गवळी, तात्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल पवार,समाधान गवळी,अक्षय गायकवाड,गणेश गवळी,गणेश चवरे, पांडुरंग चवरे,रामचंद्र कांबळे,सौरभ आवारे,आण्णासाहेब सावंत,रावसाहेब चव्हाण,आनंद आवचारे,प्रदीप कोरे,आनंद भानवसे,धनाजी आवचारे, अक्षय अवचारे,दशरथ ऐवळे,भैय्यासाहेब आवारे,जय आवारे,सचिन गवळी,बाळासाहेब मुजावर,शिवाजी गवळी आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचलन राजेंद्र आवारे यांनी केले तर आभार सौरभ आवारे यांनी मानले.