शिरोली बुद्रुक येथे श्रावणी बैल पोळा उत्साहात संपन्न झाला

31

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.27ऑगस्ट):-दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मुपो.शिरोली बुद्रुक ता.जुन्नर जि.पुणे येथे बैलपोळा सण उत्साहात व आनंदात श्रावणी बैलपोळा साजरा केला.गावातील मानाची बैलजोडी म्हणुन ग्रामस्थाच्यावतीने दरवर्षी शेतकरी अनिल डबडे व बैलजोडी घेऊन येणा-या शेतक-यांचा सत्कार ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला..आम्ही लहान मुलांनपासुन ते वयोवृध्द नागरिक,महिला,पुरुष या सणामध्ये सहभाग घेऊन आनंद मिळवितात.

ग्रामिण भागात बैलपोळा म्हणजे सर्व पाहुण्यांना पुरणपोळ्यांचे जेवण ,पाहुणे मंडळी,नातेवाईक यांची रेलचेल असते.सकाळी बैलांना आंघोळ घालुन सजवले जाते.हार तु-यांनी सजवले जाते.बासिंग बाधुन,गळ्यात घूंगरमाळा,हार पायात,गळ्यात घालुन,डोळ्याला काजळ लावुन,शिंगाना रंग लावून,बेगाड लावून,फुगे लावुन बैलांना चांगले सजवून गावातुन भव्य मिरवणुक काढली जाते.सर्व ग्रामस्थ या मिरवणुकीसाठी शेतातून गावात हजर राहतात.यावेळी सुध्दा DJ.लावुन भव्य मिरवणुक काढण्यात आली.आनंदाने हा बैलपोळा सण साजरा केला गेला.यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ अनुसयाबाई डबडे वय ९७ वर्षे,श्रीमती ताईबाई सोनवणे वय ७५ यावेळी उपस्थित राहुन बैलांसमोर उभे राहुन फोटो काढुन आनंद घेतला.

याप्रसंगी शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे,तंटामुक्ती अध्यक्ष नितीन विधाटे, पोलीस पाटील अमोल थोरवे,गणेश राऊत,रामदास बो-हाडे,गणेश डबडे,डाॅ.बी.व्ही.राऊत,निवृत्ती वाणी,सागर सोनवणे,नीलेश डबडे,विनायक थोरवे,महेंद्र थोरवे,रोहीदास भुजबळ,संजय मका,महादू शेरकर,शंकर लोहकरे इ.अन्य मान्यवर उपस्थित होते.सर्व गावातुन बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.खरचं..गड्या आपला गावच लय भारी..!अशी भावना शहरवासियांना वाटत असेल.यामधुन ग्रामसंस्कृतीचे जतन होत आहे.सर्व शेतशिवार हिरवागार फुलुन आला आहे.त्यामुळे शेतकरी आनंदी वाटत होते.