आरटीआय ब्लोकमेलींग नॉट अलौड

जळगाव जिल्हा जागृत जनमंच हे निव्वळ सेवेचे नैतिक व्यासपीठ आहे.येथे कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत, मागितले जात नाहीत.कोणीही पैसे कमावण्यासाठी येथे येत नाही.तरीही काही आरटीआय कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत.आम्ही या कायद्याचे समर्थन करतो.मदत ही करतो‌.पण कोणी माहिती ऐवजी पैशाची मागणी केली असेल किंवा कोणी देऊ इच्छित असेल,त्याची मजबुरी बनली असेल तर जळगाव जिल्हा जागृत जनमंच च्या कोअर कमेटीला किंवा वैयक्तिक कोणा सदस्याला कळवले पाहिजे.असे न करता कोणी परस्पर देणे घेणे करीत असेल तर ते निषेधार्ह तर आहेच पण आम्ही विरोध सुद्धा करतोच.

जळगाव मनपातील अनेक कर्मचारी व अधिकारी सांगतात कि,तुमचा हा मित्र आरटीआय अर्ज टाकून ब्लैकमेलींग करतो ,पैसे दिले कि चूप बसतो.तुमचे नावाचा वापर करून पैसे उकळतो.ही तक्रार करण्यापेक्षा आरटीआय ला पैसे देऊ नका.मागितले तरी देऊ नका.आणि धाडस करून आमच्या मिटींग मधे येऊन समोर बोला.तेंव्हा आम्ही स्पष्ट सांगतो कि, माहिती मागितली तर माहिती द्या.पण पेसे का देता?दिले तर तुमची कुठेतरी चोरी, हेराफेरी झाली आहे.चोरी,कामचोरी होऊ नये,जरब बसावी म्हणून आरटीआय कायद्याचा वापर केला जातो.तोच तर उद्देश आहे.

कामचुकार कर्मचारी व अधिकारी लांच घेण्यासाठी फाईली उघडत नाहीत.अर्जदार गेला कि, तुम्ही यांना भेटा,त्यांना भेटा,उद्या या, साहेब मिटींग मधे आहेत.अशी उत्तरे देतात.तो अधिकारी नालायक,बदमाष असतो.राग खूप येतो,पण ऑफिसात बसला म्हणून वाचतो.काल परवाच रावेर,बोदवड ला कर्मचारी धुवून काढला.हे धुतलेले कर्मचारी तक्रार करतात, सरकारी कामात अडथळा आणला.लांच मागणे ,घेणे सरकारी कामात येते का? कामचोर नोकर. दिरंगाई का करतो?त्याला पैसे पाहिजे असतात.हे खरे कारण ते सांगत नाहीत कि मला काहीतरी खुशाली पाहिजे.घेणारा खुशाली म्हणतो पण देणारा लांच म्हणतो.कृती एकच पण संवेदन आणि संबोधन वेगवेगळे.तसेच आरटीआय चे असू शकते.असले तरी त्याला माहिती ऐवजी पैसे देणे म्हणजे सुद्धा भ्रष्टाचार आहे.आधी चोरी केली तो पहिला भ्रष्टाचार ,चोरीची झाकाझाक केली तो दुसरा भ्रष्टाचार.

जर आरटीआय ची भीती वाटत असेल ,हृदयाचे ठोके वाढत असतील,बीपी, डायबेटिस पेशंट असाल तर चोरी तरी का करतात?नका करू चोरी.इमाने इतबारे काम करा,पगार घ्या.सुखी जीवन जगा.मुलाबाळांची प्रगती करा.आईबाप बायको ची हौसमौज करा.नोकरी ही सर्वश्रेष्ठ आहे.सरकारी नोकरी तर सर्वात उत्तम.प्रामाणिक माणसासाठी हे वरदान आहे.जर काम आणि पगार हाच हेतू ठेवला तर.

जळगाव जिल्हा जागृत जनमंचच्या लेबलचा किंवा सदस्यांच्या नावाचा, वापर करून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर ती बाब त्या संघटनेसमोर आणली पाहिजे.किंवा अण्टीकरप्शन कडून ट्रैप केला पाहिजे.असे अनेक ट्रैप महाराष्ट्र व जिल्ह्यात झाले आहेत.आरटीआय जेलमधे गेले आहेत.आरटीआय ने पैसे मागितले कि खंडणी नसते.खंडणी ही हिंसक असते.ब्लैकमेलींग ही अहिंसक असते.खंडणी आणि ब्लैकमेलींग मधे फरक आहे.आरटीआय चा परिणाम ब्लैकमेलींग होऊ शकतो.पण तो सार्वजनिक केला तर सहज थांबवता येतो.

एखादी व्यक्ती किंवा संस्थेने जास्त घबाड मारले तर अनेक आरटीआय त्याच्या मागे लागतात.आधी थोडेफार देऊन चूप बसवले जाते. आरटीआयची भूक वाढत जाते. चोराचे रक्त पिऊन समाधान होत नाही.म्हणून चोराचे मांस खाऊ इच्छितात.तेंव्हा तो चोर आपल्या मूळ स्वभावानुसार कृती करतो.ब्लैकमेलरला पुन्हा पुन्हा देण्यापेक्षा शूटर ला एकदाच देतो.अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत.सार्वजनिक पैशांची चोरी झाली असेल तर लढा ही सार्वजनिक स्वरूपाचा दिला पाहिजे. पण काही आरटीआय लोक ही चिंधी घेऊन फिरतात.तिला राकेल लावून सोबत आगपेटी दाखवतात.मी काहीही करू शकतो.शेपटीला चिंधी बांधून लंका जाळू शकतो.तेंव्हा चोर सुद्धा काहीही करू पाहातो.लढा हिंसक बनतो.

यावर आम्ही आमचा इलाज सुचवतो.जर आरटीआय कडे अशी वस्तुनिष्ठ माहिती आली असेल तर ती राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या व्यासपीठावर प्रसारित केली पाहिजे.सार्वजनिक पैशांची चोरी झाली असेल तर लढा ही सार्वजनिक स्वरूपाचा दिला पाहिजे.सार्वजनिक चोरी झाली असेल तर वैयक्तिक का लढतात?तसेच एका नोकराला,एका पुढाऱ्याला वेठीस धरून उद्देश साध्य होत नाही.भ्रष्टाचार विरोध सार्वत्रिक झाला पाहिजे.संघटनात्मक, राजकीय व्यासपीठावर आणला पाहिजे.

बहुधा राजकीय पक्ष एकमेकांचा भ्रष्टाचार उघड करीत नाहीत.ते आधिकतम एकत्र चोरी करतात.एकाच मडक्यात तोंड घालतात.खडसेंच्या भ्रष्टाचार विरोधात महाजन किंवा गुलाबराव बोलत नाहीत. गुलाबराव च्या अपहार विरोधात महाजन ,खडसे, पाटील,भोळे , चौधरी बोलत नाहीत. आमदार शिरीष चौधरी बोलत नाहीत.आता तर ते विधानसभेत तालिका घेतांना दिसले.काय उपयोग? राष्ट्रवादी चे आमदार अनिल पाटील तर मुळीच नाहीत‌.पालकमंत्रीच्या कोरोनाकाळातील अपहार विरोधात जळगाव जिल्ह्यातील चारही पक्षांचे आमदार ,भाजपचे दोन्ही खासदार बोलत नाहीत.थोढेफार चिमणराव पाटील यांना आम्ही खाजवले ,खिजवले म्हणून विधानसभेत बोलले तरी.ते सुद्धा गुलाबराव पाटील यांचा वैयक्तिक विरोधक म्हणून.खडसे नेहमीच सीडी सीडी करतात,पण कोरोनाकाळातील अपहार बाबत विधानपरिषदेत बोलले नाहीत.बोलले तर बुमरॅंग खासदार रक्षाताईंवर येऊ शकते.
जळगाव जिल्ह्यातील एकजरी आमदार किंवा खासदार जनतेशी प्रामाणिक असता तर आरटीआय अर्ज टाकण्याची गरज पडलीच नसती.हे सुद्धा चोरांच्या पंक्तीत बसून अपहाराचे भरीत जेवले आहेत.जर कोणा आमदार,खासदाराला जनाची नाही तर मनाची वाटत असेल तर या आमने-सामने,कैमेरा आणि जनतेसमोर.बुरखा फाडून जनतेसमोर नागडे करू.
आण्णा हजारे यांनी माहितीचा कायदा करवून घेतला.आता मोदीसाहेब कायद्याला कमजोर करीत असतील तर याला देशभक्ती म्हणता येणार नाही.पैसाचोर आणि कामचोर नोकरांवर आमदार खासदार मंत्री वचक ठेवत नाहीत.उलट हप्ते मागतात.वचक ठेवणाऱ्याला चुकीचे ठरवून आयपीसी ३५३ चे शस्र वापरून आण्णा नाईक सारखे कलम करीत असाल तर चुकीचे आहे.ते प्रशासनाचे शत्रू आहेत.ते सरकारचे शत्रू आहेत.ते प्रजेचे शत्रू आहेत. देशाचे शत्रू आहेत.या कलम अंतर्गत शिक्षा वाढवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे समर्थक असल्याचे निदर्शनास आले आहे.भ्रष्टाचाऱ्याच्या ढिगाऱ्यात कांग्रेस गाडली गेली.याच ढिगाऱ्यात भाजप गाडली जाणार आहे.
किरीट सोमय्या पोटतिडकीने भ्रष्टाचार उघडकीस करीत आहेत.महाराष्ट्रातील जनतेला , भारतीय जनतेला ते आवडतात.देवेंद्र फडणवीस पेक्षा कीरीट सोमय्या हिरो ठरले आहेत.फडणवीस ऐवजी सोमय्या यांना गृहमंत्री बनवले तर राजकीय चोर पकडण्याचा वेग वाढेल.राज्यपाल नियुक्त आमदारकी सोमय्या यांना गृहमंत्री करावे,ही आमची मागणी आहे.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED