मुळावा येथे एमपीजे ची नवनिर्वाचित कार्यकारिणी गठीत

37

🔹मनोज राठोड अध्यक्ष , प्रितम जोगदंडे उपाध्यक्ष, तर काझीम मुल्लाजी यांची सचिवपदी निवड

✒️सिध्दार्थ दिवेकर( जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड (दि. 28 ऑगस्ट) तालुक्यातील मुळावा येथे भारताला कल्याणकारी राज्य बनविण्यासाठी कल्याणकारी योजनांचे लाभ खऱ्या नागरिकांपर्यंत पोचण्याकरिता नागरिकांना संघटित करून संघर्ष करण्यासाठी मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्वीस फॉर वेलफेअर ( एमपीजे )ही संघटना कार्यरत आहे.

एमपीजे ही एक गैर धार्मिक गैर राजकीय रजिस्टर्ड सामाजिक संघटना आहे. संघटना देशातील नागरिकांना उपासमारी, दारिद्र रेषेतूनवर आणणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे संबंधी नागरिकांचे हक्क व अधिकार विषयी जनजागृती करण्याचे व नागरिकांना संघटित करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एम पी जे नियोजनबद्ध काम करत आहे.

राज्यभरातील लोकल युनिट, शहराध्यक्ष, व तालुका अध्यक्षाची निवड प्रक्रिया सध्या सुरु आहे. याच प्रकियेचा भाग म्हणून साईनगरी येथे निवडणुक प्रक्रीया पार पडली.

मनोज राठोड अध्यक्ष , प्रितम जोगदंडे उपाध्यक्ष, तर काझीम मुल्लाजी यांची सचिवपदी तर
कोषाध्यक्ष म्हणून
महेन्द्रा खडसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या वेळी संघटनेचे सदस्य प्रशांत भाऊ, मोहम्मद असीम, अनंता पांडे, राजू लोखंडे, शेख, सद्दाम ,अक्षय दांडेकर, सुनील हनवते, शेख इम्तीयाज, ,सतीश कांबळे, नितीन बरडे, सुखी शिरसाट, फिरोज खान, आनंद कांबळे, सुनील राठोड, आकाश कांबळे, गणेश लोखंडे, विजय बर्डे, कादर खान, विशाल बर्डे, मोहसीन मौलाना इत्यादी उपस्थीत होते.

एमपीजेचा विस्तार करून संघटनेच्या माध्यमातुन एक जनआंदोलन उभे करून कल्याणकारी योजनांचा लाभ पोहचविण्याकरिता संघर्ष करत संघटनेच्या कार्यात पुर्णपणे वाहून घेण्याचे आवाहन प्रदेश सचीव हुसेन खान यांनी केले.

निवड प्रक्रीये मध्ये फिरोजअन्सारी संस्थापक सदस्य तथा जिल्हाध्यक्ष एमपीजे यवतमाळ उपस्थित होते.