स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्याची ग्राहकाची मागणी

61

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.30ऑगस्ट):-येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान हे मागील काही दिवसापासून नियमीत उघडत नसल्याने स्वस्त धान्य घेणारे ग्राहक त्रासून परत जातात.याबाबतच्या अनेक तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जाते परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.मोलमजूरी करणारे स्वस्त धान्य दुकाना समोर सकाळी ७ वाजेपासून बसून दुकान उघडण्याची वाट पाहत राहतात परंतु दुकान‌च उघडत नसल्याने त्रासून ग्राहक परत जातात.यामुळे त्यांची कामाची वेळ निघून जाते व धान्य सुद्धा मिळत नाही.

हीच परिस्थिती दुस-या दिवसीही होते.दुकानासमोर तासनतास उभे राहून दुकान उघडत नसल्यामुळे नाईलाजाने किराणा दुकानातून राशन खरेदी करावे लागते. यामुळे बचत सुद्धा होत नाही यामुळे राशन कार्ड धारक ग्राहकांनी स्वस्त धान्य दुकान दारावर कारवाई करावी अशी तक्रार ग्राहक पंचायतकडे यांच्याकडे केल्या आहे.सदर तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन स्वस्त धान्य दुकान दारावर कारवाई करून ग्राहकांना नियमित धान्य पुरवठा करावा अशी मागणी राशन कार्ड धारकांनी निवेदनातून केली आहे.