नरखेड मधील विविध पक्षाच्या नेत्याचा व कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

29

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.2सप्टेंबर):-अनगर(ता.मोहोळ)* येथे *नरखेड* येथील.वडार समाजाचे अध्यक्ष अमोल धोत्रे,रमेश धोत्रे,राॅयल मराठा अध्यक्ष सारंग मोटे,जंगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष हणुमंत मेटकरी,धनगर समाजाचे नेते चंद्रकांत बनसोडे,सिध्देश्वर यादव सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यानी *माजी आमदार राजनजी पाटील,आमदार मा यशवंत (तात्या) माने तसेच पंचायत समिती सदस्य मा अजिंक्यराणा राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश (भाऊ) चवरे, जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल कसबे,नरखेड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज (भैय्या) पाटील, शाहजीबाबा मोटे,उत्तम तात्या मोटे, शिवाजी उबाळे,आदींसह नरखेडकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.